Zodiac Sign : आज 6 नोव्हेंबर पासून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. 5 नोव्हेंबर 2025 रोजी अर्थातच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला हिंदू पंचांगानुसार देव दीपावली साजरी करण्यात आली.
या दिवशी अशी घटना घडली ज्यामुळे काही राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे. या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा अर्चना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. दरम्यान, या शुभ मुहूर्तावर काही राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपा विशेष स्वरूपात सुरु झाली आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मेष, सिंह आणि कुंभ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार असून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. दरम्यान आता आपण या राशीच्या लोकांना नेमके कोणकोणते लाभ मिळणार यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
मेष राशी : या राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमा विशेष फलदायी ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
बेरोजगारांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळण्याची संधी निर्माण होईल. नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. मानसिक शांती आणि आनंदाची अनुभूती मिळेल.
सिंह राशी : सिंह राशीच्या जातकांसाठी ही पौर्णिमा नव्या संधी घेऊन येत आहे. नवीन करार, भागीदारी किंवा गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मात्र, कोणताही निर्णय घेताना घाई टाळावी, असे ज्योतिषांचे मत आहे. हा काळ करिअरमध्ये स्थिरता आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा आहे.
कुंभ राशी : कुंभ राशीच्या व्यक्तींना या दिवशी नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. त्यांचे परिश्रम आणि समर्पण फळास येतील. वरिष्ठांकडून मान्यता आणि सहकार्य मिळेल.
संवादकौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतल्यास भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील.