ndia Viral News : जगात कित्येक देश आहेत आणि प्रत्येक देशाची संस्कृती, भाषा, राहणीमान सारं काही बदल आहे. खाद्य संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळतो. देशातच नाही तर देशांतर्गत देखील आपल्याला सर्वच बाबींमध्ये भिन्नता दिसते. भारतासारख्या देशांमध्ये ही भिन्नता अधिक प्रकर्षाने जाणवते. भारतात काही किलोमीटरच्या अंतरावर भाषा बदलते.
आपल्या देशात सर्वाधिक भाषा बोलल्या जातात. याशिवाय देशाची खाद्य संस्कृती देखील मोठ्या प्रमाणात भिन्न आहे. आपल्या देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. ईशान्येकडील राज्याचे नाही तर आपल्या महाराष्ट्रासहित उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही मोठ्या प्रमाणात मांसाहार होतो. वेगवेगळे पदार्थ तयार करून लोक मांसाहाराचे सेवन करतात.

अंडी, मासे, चिकन, मटण, बीफ, डुकराचे मांस अशा वेगवेगळ्या मांसाचे सेवन केले जाते. पण आपल्या देशात असेही एक शहर आहे जे की पूर्णपणे शाकाहारी आहे. या शहरात मांसाहार विक्रीवर बंदी आहे तसेच मांसाहाराचे सेवन सुद्धा गुन्हा मानला जातो. भारतातील हे शहर एकमेव असे शहर आहे जे की 100% शुद्ध शाकाहारी मानले जाते.
आपल्या देशातील या एकमेव शाकाहारी शहरात प्राण्याची हत्या करणे गुन्हा मानला जातो. हेच कारण आहे की या शाकाहारी शहरांमध्ये अंडे आणि मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालून देण्यात आली आहे. नक्कीच भारतातील या अद्भुत शहराची तुम्हाला अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल. दरम्यान आता आपण याच देशाच्या अद्भुत अशा 100% शुद्ध शाकाहारी शहराची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत आहे हे शहर?.
मीडिया रिपोर्ट नुसार आपल्या शेजारील राज्य गुजरात मधील भावनगर जिल्ह्यात हे शहर आहे. या शहराचे नाव पलिताना असे असून हे जगातील असे एकमेव आणि पहिलेच शहर आहे जिथे मांसाहार पूर्णपणे बंद आहे. या शहरांमध्ये प्राण्यांना मारणे गुन्हा समजला जातो तसेच मांस खाने आणि याची विक्री करणे सुद्धा गुन्हा आहे. हे शहर शंभर टक्के शाकाहारी शहर म्हणून घोषित करण्यात आले असून या पवित्र शहरात कोणी नियम मोडला तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होते.
मिळालेल्या माहितीनुसार 2014 मध्ये या ठिकाणी सरकारने प्राण्यांची हत्या करण्यावर बंदी घातली होती. महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हापासून इथे एकही प्राणी मारला गेला नसल्याची नोंद आहे. यामुळेच या अद्भुत ठिकाणाची संपूर्ण जगात चर्चा असून येथे अनेक जण पिकनिक साठी सुद्धा येतात. जगातील पहिल्या शाकाहारी शहराला भेट देण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची इथे मोठी गर्दी पाहायला मिळते.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पवित्र शहरात जैन धर्माचे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. जैन धर्मात प्राण्यांना मारणे आणि मांसाहार करणे पाप असल्याचे मानले जाते. यामुळे जैन समाजातील साधुसंतांनी या शहरात मांसाहारावर बंदी असायला हवी अशी मागणी केली होती आणि याच अनुषंगाने इथं मांसाहार पूर्णपणे बंद झालेला आहे. या शहराची आणखी एक मोठी विशेषता म्हणजे येथील शत्रुंजय टेकड्यांवर 800 हून अधिक मंदिरे आहेत.
यात आदिनाथाचे मंदिर सुद्धा आहे. म्हणजेच हे शहर हिंदू धर्मियांसाठी तसेच जैन धर्मीयांसाठी फारच पवित्र असून हेच कारण आहे की या ठिकाणी मांसाहार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना देखील येथील लोक सात्विक जेवण देतात. महत्त्वाचे म्हणजे येथे शाकाहारी जेवण मिळत असतानाही दररोज या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे.