Nirmala Sitharaman : गेल्या काही दिवसांपासून अनेकदा तुम्ही ATM मधून पैसे काढले असतील तर तुम्हाला २ हजार रुपयांची नोट कधी पाहायला मिळाली नसेल. त्यामुळे नागरिकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत.
आता ATM मधून २ हजार रुपयांच्या नोटा जास्त करून मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांना २ हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या काय? असा प्रश्न पडायला लागला आहे. पण याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
तुम्हीही बारकाईने पाहिले तर तुम्हालाही २ हजार रुपयांची नोट क्वचित कधीतरी दिसत असेल. पण पूर्वीसारख्या २ हजार रुपयांच्या नोटा चलनात जास्त करून दिसत नाहीत. पण याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
ऑटोमेटेड टेलर मशिन्समध्ये (ATM) 2,000 रुपयांच्या नोटा लोड करण्याच्या किंवा लोड न करण्याच्या कोणत्याही सूचना बँकांना देण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती सरकारने संसदेत दिली आहे. बँकांच्या कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये कोणत्या नोटा लोड करायच्या ही त्यांची वैयक्तिक निवड आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वार्षिक अहवालानुसार, चलनात असलेल्या 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य मार्च 2017 आणि मार्च 2022 अखेर 9.512 लाख कोटी आणि 2015 अखेरीस 27.057 लाख कोटी रुपये.
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की “एटीएममध्ये 2,000 रुपयांच्या नोटा न भरण्यासाठी बँकांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. भूतकाळातील वापर, ग्राहकांची आवश्यकता, हंगामी ट्रेंड इ.च्या आधारावर बँका एटीएमसाठी रक्कम आणि मूल्याची आवश्यकता यांचे स्वतःचे मूल्यांकन करतात.
दुसर्या प्रश्नाच्या उत्तरात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, 31 मार्च 2023 पर्यंत केंद्र सरकारच्या कर्ज/उत्तरदायित्वांची एकूण रक्कम सुमारे 155.8 लाख कोटी रुपये (जीडीपीच्या 57.3 टक्के) असल्याचा अंदाज आहे. सध्याच्या विनिमय दरावर अंदाजे बाह्य कर्ज 7.03 लाख कोटी रुपये (जीडीपीच्या 2.6 टक्के) आहे.