7th pay Commission DA hike : गेल्या महिन्यात मार्चमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्के झाला आहे. तसेच पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या DA वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. २०२३ या वर्षातील पहिली DA वाढ मार्च महिन्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच आता पुढील DA वाढ देखील ४ टक्के केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०२४ मध्ये देशातील लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोठा निर्णय घेऊ शकते. जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आणखी ४ टक्के वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांच्या वर्षातील दुसऱ्या DA वाढीस केंद्र सरकारकडून सप्टेंबर महिन्यात मान्यता दिली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. याचा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
AICPI डेटानुसार, दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. असे झाल्यास कर्मचाऱ्यांची महागाई 42 वरून 46% पर्यंत वाढेल. त्यामुळे, कर्मचार्यांना मूळ वेतनाच्या 46% म्हणून प्रदान केले जाईल.
टेक होम पगारात वाढ
45 लाख 58 हजार केंद्रीय कर्मचार्यांसह 69 लाख 76 हजार निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील महागाईच्या सवलतीत 4 टक्के वाढीचा लाभ होणार आहे. यासोबतच डीए वाढल्याने टेक होम पगार वाढणार आहे.
DA-DR अपडेट करण्यासाठी एक विशेष सूत्र
गेल्या 12 महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) -115.76)/115.76)x100 हे DA टक्केवारी काढण्याचे सूत्र आहे.
त्यानुसार, 42,000 रुपये मासिक पगार आणि सुमारे 25,500 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला 9,690 रुपये DA म्हणून मिळाले असते. सर्वात अलीकडील DA वाढीसह, ही रक्कम 10,710 रुपये होईल.