Optical Illusion : आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच लोकांनाही चित्रातील आव्हान पूर्ण करण्यात मज्जा येत आहे. इंटरनेटमुळे सर्वकाही चित्रे एकमेकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.
चित्रातील वस्तू शोधणे सोपे नाही. मात्र तेच शोधण्यासाठी अनेकजण शक्कल लढवत आहेत. चित्रातील आव्हान पूर्ण करण्यासाठी काही वेळ जातो. त्या वेळेमध्येच तुम्हाला चित्रात लपलेली गोष्ट शोधून काढावी लागत आहे.
आजही तुमच्यासाठी असेच एक भन्नाट चित्र आणले आहे ज्यामध्ये तुम्हाला एक डोनट शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाचा कालावधी आहे.
चित्रात काय काय आहे?
चित्रामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. मांजर, खिडकी, पुस्तके आणि इतरही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सोफ्यावर मांजर बसली आहे. तसेच खोलीत कार्पेट अंथरले आहे.
यामध्ये तुम्हाला डोनट शोधायचे आहे. डोनट तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही. मात्र तेच शोधण्याचे तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही खलीतील अनेक ठिकाणी डोनट शोधण्याचा प्रयत्न करू शकता.
तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना डोनट लगेच सापडू शकते. मात्र काहींना ते सापडणे कठीण असेल. अनेक लोकांनी हे डोनट शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील काही मोजक्याच लोकांना हे डोनट शोधण्यात यश आले आहे.
जर तुम्हालाही चित्रातील डोनट सापडले नसेल तर काळजी करू नका खालील चित्रात तुम्ही सहजपणे डोनट पाहू शकता. ज्यामध्ये तुम्हाला जास्त शोधण्याची गरज नाही.