७ मार्च २०२५ नवी दिल्ली : देशात आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्याआधारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामपंचायतीं निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि कन्यास्नेही असलेली किमान एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी ५ मार्च रोजी नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालयाने आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायतींवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या २०२५ च्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील निवडक ग्रामपंचायतींमधील १५०० हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभाग घेतला. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध विभाग, ग्रामीण विकास आणि पंचायत राज राज्य संस्था आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधीसह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

राष्ट्रीय परिषदेत आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायतींसाठी आभासी प्रशिक्षण कार्यक्रम आणि भारतातील या महिलास्नेही ग्रामपंचायतींच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी एक व्यापक रिअल टाइम मॉनिटरिंग डॅशबोर्ड यासारख्या उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी नेतृत्व कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ७७० आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायतींची निवड करण्याची घोषणा केली. दरम्यान, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी नेतृत्व कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ७७० आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायतींची निवड करण्याची घोषणा कार्यक्रमात केली.
पंचायतींचे सहकार्य महत्त्वाचे – पटेल
गावांमध्ये आरोग्य उपक्रमांच्या यशासाठी पंचायतीचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आपल्या भाषणात केले. महिला आणि मुलांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक आरोग्य उपक्रमांचा त्यांनी यावेळी आढावा सादर केला