Electric Bike : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्या स्वतःची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करत आहेत. तसेच इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी देखील वाढत आहे.
अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार किंवा बाईक उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता अनेक कंपन्या स्वस्त इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. त्यामुळे तुम्हीही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू शकता.

आर्य ऑटोमोबाईल्स कंपनीने देखील रॉयल एनफील्ड लुकसह नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.
आर्य कमांडर इलेक्ट्रिक बाइक
आर्य ऑटोमोबाईल्स कंपनीने दमदार लुकसह इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. भन्नाट लूक आणि उत्तम परफॉर्मन्स पॉवर असलेली इलेक्ट्रिक बाइक ग्राहकांना कमी किमतीमध्ये उपलब्ध असणार आहे.
ही इलेक्ट्रिक बाईक पाहिल्यानंतर तुम्हाला रॉयल एनफिल्डची बाईक थंडरबर्डची आठवण येईल. कंपनीने यात स्प्लिट कुशन सीट, पॅसेंजर फूट रेस्ट आणि डिजिटल कंट्रोल पॅनल दिले आहे.
यासोबतच गोल आकाराचे एलईडी हेडलाइट आणि मागील बाजूस टेललाइटसह एलईडी टर्न सिग्नल लाईट देण्यात आल्या आहेत. पेट्रोल टाकीच्या जागी बॅटरी देण्यात आली आहे.
आर्य कमांडर इलेक्ट्रिक मोटरसायकल पॉवर आणि परफॉर्मन्स
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 4.4 KWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक सिंगल चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत धावू शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे.
वैशिष्ट्ये
क्लासिक दिसणाऱ्या आर्य कमांडरमध्ये, कंपनीने तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत, जे इको, स्पोर्ट आणि इनसेन म्हणून ओळखले जातात. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये GPS नेव्हिगेशन, एअर-कूलिंग सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर,
ओडोमीटर, ट्रिपमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जिओ फेन्सिंग, यूएसबी चार्जिंग पोर्ट, टीएफटी कलर डिस्प्ले, रिव्हर्स असिस्ट आणि कमी बॅटरी इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.