Aadhaar Card : देशातील सर्व आधार कार्डधारकांसाठी सरकारने मोठी घोषणा करत एक नवीन सुविधा सुरु केली आहे.
ज्यामूळे आता देशातील लाखो आधार कार्डधारकांना मोठा फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही दहा वर्षे जुने आधार कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्वाची ठरणार आहे.
जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते लवकर पूर्ण करा. नवीन नियमांनुसार, तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम अगदी मोफत करू शकता त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ही सुविधा दोन महिने सुरू राहणार आहे.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. तुम्ही तुमचे 10 वर्षे जुने आधार कार्ड 14 जून 2023 पर्यंत सहजपणे अपडेट करू शकता ज्यासाठी अनेक अटी ठेवल्या आहेत.
ही सुविधा 15 मार्चपासून सुरू असून ती 14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जात होते ते रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नियोजित तारखेपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सरकार या कामासाठी शुल्क आकारू शकते ज्यामुळे लोकांच्या खिशावर परिणाम होईल.
कामे रखडतील
जर तुमचे आधार कार्ड अपडेट केले नाही तर अनेक कामे मध्येच लटकतील त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आधार कार्डाशिवाय तुम्ही तुमचे खाते कोणत्याही बँकेत उघडू शकत नाही.
एवढेच नाही तर तुम्हाला कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ दिला जाणार नाही, त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. म्हणूनच तुम्ही हे काम त्वरित पूर्ण करा.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांनी केली जुन्या पेन्शन योजनेबाबत ‘ही’ मोठी घोषणा