Aadhaar Card Update : फक्त एकच नाही तर आधार कार्डचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या फायदे

Ahmednagarlive24 office
Published:

Aadhaar Card Update : आता प्रत्येक कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही आर्थिक काम पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की आधार कार्डचे किती प्रकार आहेत.

देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आधारकार्ड देखील एक आहे. कोणत्याही सरकारी किंवा खाजगी ठिकाणी काम असेल तर सर्वात प्रथम आधार कार्ड मागितले जाते.

जर तुम्हाला आधार कार्डचे किती प्रकार आहेत हे माहिती नसेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. पीव्हीसी कार्ड, ई आधार कार्ड,आधार पत्र आणि एम आधार कार्ड असे आधार कार्डचे वेगवेगळे प्रकार आहेत.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आधार कार्डचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.

पीव्हीसी कार्ड

UIDAI कडून आधार पीव्हीसी कार्ड हे सादर करण्यात आले आहे. आधार कार्डचे हे सगळ्यात नवीन रूप असून या आधार कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, छायाचित्र आणि अनेक सुरक्षा फीचर्ससह डिजिटल फॉर्म उपलब्ध आहे. ते तुम्हाला व्हर्च्युअल आयडी, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी आयडी वापरून 50 रुपये नाममात्र शुल्कासह ऑनलाइन ऑर्डर करण्यात येऊ शकते.

ई आधार कार्ड

या आधार कार्डमध्ये आधारचे फक्त चार अंक दिसत असून डेटा सेव्ह करण्यासाठी ई-आधारचा वापर करण्यात येतो. परंतु तुमच्या फोनमध्ये हे आधार कार्ड उघडण्यासाठी पासवर्डची गरज लागते. कोणत्याही व्यक्तीला आपल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड ई-आधार म्हणून डाउनलोड करता येते.

एम आधार कार्ड

आता कोणत्याही नागरिकाला त्याच्या फोनवर अॅप डाऊनलोड करून त्याच्या आधारची ई-प्रत त्यांच्याजवळ ठेवता येते. हे लक्षात घ्या की तुम्हाला हे अॅप डाउनलोड करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. या प्रकारच्या आधार कार्डला एम आधार कार्ड असे म्हणतात.

आधार पत्र

जर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड हरवले असेल तर त्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत आधार पत्र डाउनलोड करता येते. हे आधार पत्र फक्त OTP द्वारे डाउनलोड करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe