अबब…मुकेश अंबानींनी खरेदी केले तब्बल ७२८ कोटी रुपये किमतीचे हॉटेल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- श्रीमंत व्यक्तींचे शोक पण जरा जगावेगळेच असतात. एखादी वस्तू आवडली कि ती खरेदी करायची भले त्याची किंमत काही असो… तर काही यशस्वी उद्योजक आपला व्यवसाय सातासमुद्रापार देखील वसवतात.

याचेच एक उदाहरण म्हणजे देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे होय. नुकतेच अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल मँडारीन ओरिएंटल विकत घेण्याची घोषणा केली.

भारतीय चलनात या हॉटेलची किंमत सुमारे ७२८ कोटी रुपये आहे. मँडारीन ओरिएंटल हे न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेलपैकी एक आहे. अंबानींच्या रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हे दुसरे हॉटेल विकत घेतले आहे.

दरम्यान २००३ मध्ये बांधलेले, मँडरीन ओरिएंटल हॉटेल हे ८० कोलंबस सर्कल, न्यूयॉर्क येथे सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या अगदी शेजारी आहे.

जगप्रसिद्ध असलेल्या या हॉटेलची प्रत्येक खोली अत्याधुनिक उपकरणे, ऑटो सॅनिटायझेशन आणि लक्झरी फीलिंग देणारी आहे. काही खोल्या रिव्हर फेसिंग आहेत, काही सेंट्रल पार्क आणि काही कोलंबस सर्कल फेसिंग आहेत.

हॉटेलमध्ये पेंटहाऊस आणि टू रूम सूट सारख्या खोल्या देखील आहेत, जेणेकरून मोठ्या कुटुंबाला चांगली सुविधा मिळेल. हॉटेलमध्ये आर्ट म्युझियम आणि म्युझिक कलेक्शन, शेफ साइज किचन, स्टडी आणि मीडिया सेंटर,

लार्ज फ्लोर-टू-सीलिंग विंडो, प्रीमियम साउंड सिस्टम आहेत. हॉटेलमध्ये एक लक्झरी बार देखील आहे.तसेच हॉटेलमध्ये आरामदायी स्पा आणि जिम देखील आहेत.

हॉटेलमध्ये अंडर रुफ स्विमिंग आणि ओपन स्विमिंग एरिया देखील आहेत. लोक त्यांच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News