About Crow : काय सांगता! घराच्या या दिशेने कावळ्याचा आवाज आला तर होईल शुभ लाभ; जाणून घ्या सविस्तर

About Crow : तुम्ही अनेकदा निरीक्षण केले असेल की घराच्या आजूबाजूला नेहमी कावळा ओरडत असतो. हिंदू धर्मामध्ये कावळ्याला यमाचा दूत मानले जाते. त्यामुळे घरच्यांना अनेकदा कावळा ओरडला की काही ना काही म्हणताना ऐकले असेल.

कावळा हा एक असा पक्षी आहे की तो घराच्या आसपास ओरडला की काही ना काही शुभ किंवा अशुभ घडणार हे अनेकदा लोक म्हणत असतात. आज तुम्हाला शकुनी शास्त्राबद्दल सांगणार आहोत.

शुभ संकेत

उत्तरेला कावळा ओरडणे

शकुनी शास्त्रामध्ये कावळ्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. दुपारी उत्तर किंवा पूर्व दिशेकडून कावळ्याचा आवाज येत असेल तर ते शुभ मानले जाते. असे झाल्यास स्त्री सुखाचे लक्षण मानले जाते.

कावळे पाणी पिताना दिसणे

तुम्ही अनेकदा कावळा पाणी पिताना पाहिले असेल. तसेच त्याला दगडही मारला असेल. पण पाणी पिताना कावळा दिसणे हे शुभ मानले जाते. जर तुम्हाला कावळा पाणी पिताना दिसला तर तुम्हाला पैसे मिळण्याचे संकेत असतात. तसेच तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश देखील मिळते.

कावळा तोंडात भाकर घेऊन उडून जाताना

जर तुम्हाला कावळा तोंडामध्ये भाकरी घेऊन जाताना दिसला तर ते शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्याचे संकेत मिळत असतात. त्यामुळे कावळ्याने भाकरी तोंडात घेऊन जाणे एकप्रकारे चांगलेच आहे.

कावळ्याचा स्पर्श

अनेकदा कावळ्याचा स्पर्श अशुभ मानला जातो. पण काही वेळा जर सकाळी कावळ्याचा स्पर्श झाला तर ते शुभ मानले जाते. यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होण्याचे संकेत मिळत असतात.

अशुभ संकेत

कावळ्यांचा कळप पाहणे

अनेकदा कावळ्याचा कळप दिसत असतो. त्यामुळे असे दिसणे अशुभ मानले जाते. कावळ्याचा कळप दिसणे म्हणजे लवकरच संकट येणार असल्याचे मानले जाते. जर एखाद्याच्या घराच्या छतावर कावळ्यांचा कळप आवाज करत असेल तर तो देखील अशुभ मानला जातो.

दक्षिणेकडे तोंड करून

जर तुमच्या घराच्या बाजूला दक्षिणेकडे तोंड करून कावळा ओरडत असेल ते देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाला मृत्यूसारख्या वेदनांना सामोरे जावे लागू शकते.

डोक्याला स्पर्श करणे

डोक्याला कावळ्याने स्पर्श केले तर अशुभ मानले जाते. जर डोक्याला कावळ्याने स्पर्श केला तर नक्कीच तुम्ही आजारी पडणार असल्याचे संकेत असतात. त्यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe