Vivo T2 5G : फक्त ‘इतक्याच’ किमतीत खरेदी करता येणार विवोचा शक्तिशाली फोन, डिटेल्स झाले लीक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo T2 5G : दिग्ग्ज टेक कंपनी उद्या म्हणजे 11 एप्रिल रोजी Vivo T2 5G सीरीज भारतात लाँच करणार आहे. परंतु लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीच्या या फोनचे डिटेल्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. जर किमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन तुम्ही 20,000 रुपयात सहज खरेदी करू शकता.

कमी किमतीत जास्त स्पेसिफिकेशन पाहायला मिळतील. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत Vivo वेबसाइट, फ्लिपकार्ट तसेच देशातील निवडक रिटेल स्टोअरला भेट द्यावी लागणार आहे. यात कंपनीने कोणती फीचर्स दिली आहेत पहा.

कंपनीच्या या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आगामी फोनमध्ये Vivo T2 5G Android 13 वर चालण्याची शक्यता आहे. तर फोनसाठी 5.33GB रॅम सुचवली आहे, जी नंतर 6GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

काय आहेत Vivo T2 5G चे फीचर्स?

आगामी फोन लिस्टिंग 6 एप्रिल रोजी गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर झाला असून ज्यात Vivo T2 5G स्मार्टफोन मॉडेल क्रमांक V2240 सह दर्शविला गेला. या CPU गती Vivo T2 5G वर स्नॅपड्रॅगन 695 SoC ची उपस्थिती सूचित करत आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर चिपसेटचे कोडनेम “होली” असणार आहे. यात 2.21GHz च्या कमाल क्लॉक स्पीडसह दोन CPU कोर आणि 1.80GHz वर कॅप केलेले सहा कोर देण्यात येत आहेत.

किती असणार किंमत?

लॉन्च कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. भारतात Vivo T2 5G हा फोन 11 एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे. इतकेच नाही तर Vivo T2x 5G देखील एकाच वेळी पदार्पण करणार आहे. हा फोन तुम्ही Flipkart, अधिकृत Vivo वेबसाइट आणि देशभरातील निवडक रिटेल स्टोअरद्वारे विकत घेऊ शकता. फोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे.