Palmistry : ज्योतिषशास्त्रात अनेक भविष्य सांगण्यात आले आहेत. तसेच लग्नकार्य किंवा ज्या वेळी कुंडली पहिली जाते तेव्हा ती ज्योतिषशास्त्रानुसारच पहिली जाते. कुडंलीमधून अनेकदा माणसाचे व्यक्तिमत्व, आचरण आणि भविष्य सांगितले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार अनेक लोकांच्या हातांवरील रेषांवरून भविष्य पाहिले जाते. तसेच हातावरील रेषा पाहून भविष्य, करिअर किंवा वैवाहिक जीवन कसे असेल हे देखील पहिले जाते. तसेच काहींच्या हातावरील रेषा त्यांना नशीबवान बनवत असतात.
नशिबाची साथ
तुम्ही जर तुमच्या हातावर पाहिले तर तुम्हाला अनेक लहान मोठ्या रेषा दिसतील. मात्र या रेषा अनेकदा तुमचे भविष्य ठरवत असतात. तळहातावरील हृदयाची रेषा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ते करंगळीच्या खालून बाहेर पडून कोणत्याही भागात जाऊ शकते. ही रेषा नशीब चमकवते.
हुशार
हस्तरेषा शास्त्रानुसार हृदय रेषेच्या शेवटी बृहस्पति पर्वताजवळ त्रिशूल चिन्ह असेल तर असे लोक खूप धार्मिक असतात. हुशार असण्यासोबतच हे लोक दूरदृष्टीचे असतात. हे लोक स्वतःहून खूप काही साध्य करतात.
प्रामाणिक
हातावरील रेषा बरंच काही सांगून जात असतात. अशी एक रेष आहे जी तुमची प्रामाणिकता ठरवत असते. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातातील हृदयाची रेषा न कापता थेट शनी पर्वतावर पोहोचते, तर असे लोक आपल्या कामाशी प्रामाणिक असतात.
अशा लोकांकडे पैसाही टिकून राहतो. तसेच असे लोक समाजात नाव देखील कमावतात तसेच हे लोक शांत स्वभावाचे असतात. इतरांपासून काहीही लपवून ठेवत नाहीत त्यांचे मन अगदी साफ असते.
नशीबवान
ज्या लोकांच्या तळहातावर हृदय रेषा सोबत हेड लाईन आणि लाईफ लाईन पूर्णपणे स्पष्ट आणि लांब असते, अशा लोकांना खूप भाग्यवान मानले जाते. त्यांना आयुष्यभर नशिबाची साथ मिळते. कमी मेहनत करूनही त्यांना भरपूर यश मिळते.