Chanakya Niti : चाणक्यांच्या मते या एका वस्तूचे दान करणारा व्यक्ती कधीच होत नाही गरीब…

Published on -

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक आर्थिक, सामाजिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल काही धोरणे सांगितली आहेत. त्याचा जीवनात वापर केल्याने माणसू नक्की सुखी होऊ शकतो. चाणक्यांनी दिलेले सल्ले आजही अनेकजण वापरतात.

आचार्य चाणक्य यांची धोरणे जगभर प्रचलित आहेत. जीवन जगात असताना आनंदी कसे राहाचे याबद्दलही आचार्य चाणक्य यांनी खूप गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचे पालन केल्याने जीवनात एक दिवस नक्की यश मिळेल.

आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे चान्गले मानले जाते. दान करण्यासंदर्भात चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितली आहेत. दान हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये करता येते. दान केल्याने कधीच गरिबी येत नाही असे चाणक्य सांगतात.

धार्मिकदृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे श्रेष्ठ दान मानले जाते. पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा काहीतरी दान करणे श्रेष्ठ मानले आहे.

नन्नोदकसम दानम् न तिथर्वादशी सम ।

न गायत्र्यः परो मंत्र न मातुर्दैवत परम् ।

आचार्य चाणक्य यांच्या या श्लोकाचा अर्थ असा की अन्न-पाणी दान करण्यासारखे कोणतेही कार्य नाही. द्वादशीसारखी तिथी नाही, गायत्रीसारखा मंत्र नाही आणि आईपेक्षा मोठी देवता नाही.

दान करण्याच्या व्यक्तीला चांगले पुण्य लाभते. तसेच गायत्री मंत्राला सर्वाधिक महत्व आहे. सर्व देवी-देवतांमध्ये आईपेक्षा मोठा दुसरा देव नाही. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद सर्वात प्रथम घेतला पाहिजे.

विद्या दान

चाणक्याने विघा दान, भू दान, कन्या दान, वस्त्र दान, अन्न दान आणि गाय दान यांना आपल्या नैतिकतेतील सर्वोत्तम दानांच्या श्रेणीत ठेवले आहे. चाणक्य म्हणतात की, ज्ञानाचे दान हे सर्वोत्तम आहे, कारण ते कधीही संपत नाही, त्यामुळे माणसाचा मानसिक विकास होतो.

दान करत असताना ते कोणाला करायचे हे देखील समजले पाहिजे. अन्यथा ते दान करण्याला काही महत्व राहत नाही. ज्या व्यक्तीला गरज आहे अशा लोकांनाच दान केले पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe