Chanakya Niti : आजकाल सर्वांचेच जीवन व्यस्त झाले आहे. मात्र या व्यस्त जीवनात अनेक गोष्टी बारकाईने पाहणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या धोरणांचा मानवाला आजही वैवाहिक किंवा व्यवसायिक जीवनात उपयोग होत आहे. चाणक्यनीतीमध्ये मानवाला जीवनात सुख प्राप्त करायचे असेल तर काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी आचरणात आणून मानवी जीवन सुखी होऊ शकते.

पैशांचे मॅनेजमेंट
पुढील भविष्य सुखी आणि आनंदी जगायचे असेल तर तुम्हाला पैशांची बचत करावी लागेल. पैशाचा योग्य वापर करावा. पैसे हा सर्वांकडे असतो पण त्याचे व्यवस्थापन अनेकांना करता येत नाही. पैसा कुठे वापरायचा आणि कशी बचत करायची हे कळाले पाहिजे.
जीवनसाथी
आजच्या जीवनात चांगली पती किंवा पत्नी मिळणे म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे. चाणक्य सांगतात की ज्यांनी मागील जन्मी चांगले कर्म केले त्यांनाच योग्य जीवनसाथी मिळतो. जो मरेपर्यंत सुख-दु:खात खांद्याला खांदा लावून उभा असतो.
कामावर नियंत्रण
जीवनात नेहमी चांगले काम केले पाहिजे. चुकीचा मार्ग वापरून कधीही कोणतेही काम करू नये. चांगले काम करण्याची शक्ती ज्या व्यक्तीकडे असते तो भाग्यवान असतो. ज्या व्यक्तीला लैंगिक शक्ती कशी नियंत्रित करायची हे माहित असते, तो जीवनात नेहमी आनंदी असतो.
दान करण्याची भावना
जीवनात पैसे कमवत असताना दान करण्याची भावना नेहमी असावी. गरजूना मदत करत राहावी. दान करण्याची भावना असल्याने जिरवण आनंददायी बनते. तसेच पैसाही दुप्पट होतो.