Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनात सुखी संसार करण्यासाठी अनेक धोरणे चाणक्यांनी सांगितली आहेत. त्याचा आजही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.
जीवन जगत असताना अनेकांचे मित्र, नातेवाईक आणि इतर व्यक्तींचे कार्य खूप महत्वाचे असते. मात्र काही लोकांपासून तुम्हाला हानी देखील पोहचू शकते. सर्व व्यक्तीवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
चाणक्यांच्या मते आयुष्यात काही लोकांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे चाणक्यांच्या मते अशा ८ लोकांवर विश्वास ठेवणे तुमचे जीवन उध्वस्त करू शकते.
तक्षस्य विष दन्ते मक्षिकायस्तु मस्तके ।
वृश्चिकस्य विषम पुच्छे सर्वांगे दुर्जने विषम् ।
या श्लोकात चाणक्य सांगतात की जगात 8 प्रकारचे लोक आहेत ज्यांना कोणत्याही व्यक्तीची समस्या समजत नाही. चाणक्यानुसार राजा, यमराज, अग्नि, बालक, चोर, वेश्या, भिकारी यांच्यावर कोणत्याही दुःखाचा प्रभाव पडत नाही. यासोबतच गावकऱ्यांना वेदना देणारे इतरांच्या दु:खाने दु:खी होत नाहीत.
चाणक्य म्हणतात की, आपल्या व्यथा किंवा वेदना त्याच्यासमोर सांगण्याचा कोणताही परिणाम होत नाही. चाणक्य मानतात की या लोकांचा सामना करताना संयमाने आणि समजून घेऊन वागले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार या लोकांपासून दूर राहणे चांगले राहील.
सापाचे विष दातांमध्ये, माशीचे विष डोक्यात आणि विंचूचे विष शेपटीत असते. म्हणजेच विषारी प्राण्यांच्या प्रत्येक अंगात विष असते. पण दुष्ट माणसाचे सर्व अवयव विषाने भरलेले असतात. चाणक्य म्हणतो की, दुष्ट लोक नेहमी स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःचे विष वापरतात असे चाणक्य म्हणतात.