Inflation Alert : ग्राहकांना पुन्हा महागाईचा फटका! आता अमूलपाठोपाठ आणखी एका कंपनीने केली मोठी दरवाढ

दोन दिवसांपूर्वी दिग्ग्ज कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या किमतीत मोठी वाढ केली होती, अशातच आणखी एका कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

Inflation Alert : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. नुकतेच अमूलने दुधाच्या किमती वाढवून ग्राहकांना महागाईची झळ सोसायला लावली आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले असून त्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता अमूलपाठोपाठ पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड या दुधाच्या ब्रँडनेही लिटरमागे 3  रुपयांनी वाढ केली आहे. हे नवीन दर 4 फेब्रुवारी म्हणजे आजपासून लागू झाले आहेत. जाणून घेऊयात नवीन किमती..

जाणून घ्या नवीन दर

Advertisement

पूर्वी 57 रुपये प्रतिलिटर दर असलेले मानक दूध आता 60 रुपये आहे, तर फुल क्रीम दूध, ज्याची किंमत पूर्वी 60 रुपये प्रति लीटर इतकी होती. आता त्याची किंमत 66 रुपये प्रति लिटर आहे. टोन्ड दूध, ज्याची किंमत पूर्वी 51 रुपये प्रति लीटर होती, आता ते दूध 54 रुपये आहे. डबल टोनिंग दुधाच्या 500 मिली पॅकची किंमत 23 रुपयांवरून 24 रुपये आणि 6 लिटर पॅकची किंमत 258 रुपयांवरून 273 रुपये केली आहे.

अमूलने केली दरवाढ

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) च्या मतानुसार, अमूलच्या पाऊच्ड दुधाच्या किमतीत सर्व जातींसाठी प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने म्हटले आहे, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अमूल पाउच दुधाच्या (सर्व प्रकार) किमती 2 फेब्रुवारी 2023 रात्रीपासून वाढवल्या आहेत.”

Advertisement