Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा महिला वेळेपूर्वीच होतात वृद्ध; जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना भारतच नव्हे तर जगातलील पहिले अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, नीतितज्ञ म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथात सांगितलेली अनके धोरणे आजही मानवाच्या जीवनात उपयोगी पडत आहेत.

चाणक्य नितीमध्ये चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तंतोतंत लागू पडतात. मानवाच्या वैवाहिक जीवनाबद्दलही चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी अनेक तत्वे सांगितली आहेत.

आचार्य चाणक्य यांनी नेहमी चांगली संगत करण्यास सांगितली आहे. तसेच इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा देखील चांगला असेल तरच तुम्ही जीवनात तुमचे ध्येय गाठू शकता. काही महिलांना म्हातारपण लवकर येते याबद्दल आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य नीतीच्या १७ व्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी स्त्री, पुरुष आणि घोडा यांच्या वृद्धावस्थेबद्दल सांगितले आहे. अनेकजणांना लवकरच म्हातारपण येते पण ते कसे टाळता येऊ शकते याबद्दलही चाणक्य यांनी सांगितले आहे.

चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायाच्या १७व्या श्लोकात सांगितले आहे की, जे लोक सतत प्रवास करत असतात अशा लोकांना लवकर म्हातारपण येते. प्रवासात येणार थकवा आणि बाहेरील अस्वच्छ खाण्यात येणाऱ्या वस्तू याला कारणीभूत ठरतात.

घोड्याबद्दलही आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जर पाळीव घोडा सतत बांधून ठेवला असेल तर तो लवकर म्हातारा होतो. कारण घोडा हा मुक्त फिरणारा प्राणी आहे. पण सतत बांधून ठेवणे त्याच्या भौतिक स्वरूपाच्या विरुद्ध आहे.

चाणक्यनीतीमध्ये स्त्रियांबद्दल जे वर्णन केले आहे ते थोडेसे विचित्र असले तरी खरे आहे. चाणक्य शास्त्रानुसार जर पती पत्नीला शारीरिक सुख देत नसेल तर ती असंतुष्ट राहते आणि ती लवकर वृद्ध होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe