Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा वैवाहिक जीवनातील स्त्री पुरुषांना अधिक फायदा होत आहे. जीवनात यशस्वी होईचे असेल किंवा घरात सुख-शांती हवी असेल तर यासाठीही चाणक्य यांनी उपाय सांगितले आहेत.
प्रत्येकाला आपापल्या कुटुंबामध्ये सुख आणि शांती हवी असते. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन समृद्ध व्हावे असेही सगळ्यांनाच वाटत असते. मात्र काही कारणास्तव असे होत नाही. चाणक्याच्या धोरणांचा उपयोग तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरात सुख शांती लाभेल.

घरातील सुख शांती मुख्यतः स्त्रियांवर अवलंबून असते. स्त्रियांबद्द्लही चाणक्यांनी चाणक्य नीती मध्ये अनेक धोरणे सांगितली आहेत. अशा स्त्रिया सदैव कुटुंबासाठी तयार असतात आणि त्याच स्त्रियांना कुटुंबासाठी शुभ मानले जाते.
महिला प्रत्येक बाबतीत रडतात
अनेकवेळा तुम्ही घरात पहिले असेल की छोट्याशा गोष्टीवरूनही काही स्त्रियांना रडायला येते. अशा स्त्रिया कोमल हृदयाच्या असतात. अशा महिलांना पती आणि कुटुंबापासून दूर राहायचे नसते. अशा स्त्रिया कधीही कोणाचे वाईट करत नाहीत.
धार्मिक कार्यात रुची असणाऱ्या स्त्रिया
ज्या स्त्रियांना धार्मिक कार्यात आवड असते अशा महिला नेहमी कुटुंबामध्ये सुख शांती लाभावी यासाठी प्रयत्न करत असतात. अशा स्त्रिया फक्त त्यांच्या स्वतःच्या उद्देशात मग्न असतात आणि इतरांच्या यश किंवा अपयशाने त्यांना त्रास होत नाही.
शिस्तबद्ध असणाऱ्या स्त्रिया
ज्या स्त्रिया शिस्तबद्ध राहतात, त्यांना लवकर यश मिळते. अशा परिस्थितीत महिला इतरांसाठी प्रेरणास्थान असतात. अशा महिलांना कुटुंबासह समाजातही सन्मान मिळतो.
कोणाचाही द्वेष न करणाऱ्या महिला
समाजात अशा काही स्त्रिया आहेत त्या नेहमी इतरांचा द्वेष करत असतात. अशा स्त्रिया कधीही कुटुंबाला सुखी ठेऊ शकता नाहीत. ज्या स्त्रियांच्या मनात राग नसतो अशा कोणाबद्दल द्वेष नसतो अशा स्त्रिया नेहमी कुटुंबाला सुखी ठेवतात.