Chanakya Niti : चाणक्यांच्या मते दुखी लोकांना या ३ गोष्टींपासून मिळते शांती, जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी…

Published on -

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मानवी जीवनात अनेकांना उपयोग होत आहे. तसेच आचार्य चाणक्य यांनी जीवनात दुखी असणाऱ्या लोकांबद्दलही भाष्य केले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात चढ उतार हे येत राहतात. मात्र ज्यावेळी संकट असेल त्यावेळी शांत आणि संयम ठेऊन कोणताही निर्णय घेणं गरजेचे असते. रंगाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकूही शकतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते ज्याप्रमाणे दूध न देणारी आणि गर्भधारणा न करणाऱ्या गायीपासून काही फायदा होत नाही, त्याचप्रमाणे मुलगा जर विद्वान असेल आणि आई-वडिलांची सेवा करत नसेल तर त्याच्यापासून काही फायदा होऊ शकत नाही.

किं तया क्रियते धेन्वा या न दोग्ध्री न गर्भिणी।
कोऽर्थः: पुत्रेण जातेन यो न विद्वान् भक्तिमान्।।

वरील श्लोकात चाणक्य म्हणतात, जी गाई दूध देत नाही तिची गर्भधारणा होत नाही अशी गाई कोणतेही पाळणार नाही. जो मुलगा शिकलेला आहे आणि आई वडिलांची सेवा करत नाही अशा मुलांचा जीवनात काहीही उपयोग नाही.

दुखी व्यक्तीला या तीन गोष्टींतून शांती मिळते

दुखी माणसाला चाणक्यांच्या मते पहिले म्हणजे चांगले मूल होणे. दुसरा म्हणजे स्त्रियांचा पवित्रता आणि तिसरा म्हणजे सज्जनांचा सहवास या तीन गोष्टींपासून शांती मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe