7th pay commission DA Hike : केंद्र सरकारकडून होळीपूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांना गोड आणि आनंदाची बातमी दिली आहे. पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याबाबतही केंद्र सरकार उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत उद्या म्हणजेच १ मार्च रोजी मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक होळीपूर्वी मोठी बातमी मिळू शकते.
केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जर वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या १ मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला तर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. होळीपूर्वी याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. जर महागाई भत्ता वाढ निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि पेन्शनधारकांनाही वाढीव पेन्शन मिळू शकते.
४ टक्क्यांपर्यंत महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित
डिसेंबर 2022 साठी AICPI ची आकडेवारी देखील कामगार मंत्रालयाकडून आली आहे. असे दिसते की डीए वाढ आणि डीआर 4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या डिसेंबर 2022 मधील AICPI आकडेवारी नोव्हेंबरच्या तुलनेत घसरली आहे.
एआयसीपीआयच्या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सातत्याने वाढ झाली होती. पण डिसेंबरमध्ये एआयसीपीआयच्या आकडेवारीत थोडीशी घसरण झाली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकांवर घसरला आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकांवर होता. सप्टेंबरमध्ये ते 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.9 होते. मात्र, त्यानंतरही महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता ३८ ते ४२ टक्के असेल
जर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना DA ४२ टक्के होऊ शकतो. सध्या कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के आहे. मागील वेळी कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.
महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो
केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. मात्र नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये अजून एकदाही वाढ करण्यात आली नाही. लवकरच कर्मचाऱ्यांचा DA वाढवला जाऊ शकतो.