सहा महिन्यांनंतर ४ अंतराळवीर पृथ्वीवर परतले

Published on -

India News : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (आयएसएस) अभियान पूर्ण करत ६ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ४ अंतराळवीर सोमवारी पहाटे पृथ्वीवर परतले. त्यांना पृथ्वीवर घेऊन आलेले ‘स्पेस एक्स’ कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अटलांटिक महासागरात पॅरेशूटच्या मदतीने उतरल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर स्टीफन बोवेन, वॉरेन ‘वुडी’ होबर्ग, रशियाचे आंद्रेई फेदयेव व संयुक्त अरब अमीरातचे सुल्तान अल-नेयादी हे चौघे अभियान पूर्ण करून पृथ्वीवर दाखल झाले.

अल-नेयादी हे अंतराळात एवढा प्रदीर्घ काळ थांबणारे आखाती देशांमधील पहिले व्यक्ती आहेत. मार्चमध्ये आयएसएसवर पोहोचवल्यापासून आंघोळीसाठी गरम पाणी, गरम कॉफीचा कप व समुद्राच्या हवेसाठी आसुलेलो आहोत, अशी भावना अल-नेयादी यांनी व्यक्त केली होती.

‘स्पेस एक्स’ रविवारीच पृथ्वीवर दाखल होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्याला एक दिवस उशीर झाला. या चौघांची जागा घेणाऱ्या इतर लोकांना एक आठवड्यापूर्वीच ‘स्पेस एक्स’ ने आयएसएसवर पाठवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News