हातावर नारळ ठेवून खरंच जमिनीतील पाण्याचा शोध लागतो का? यामध्ये कितपत तथ्य आहे? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो तो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा. कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणे व त्याच ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदायला घेणे हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता खूप महत्त्वाचे आहे.त्याकरिता ग्रामीण भाग असो वा शहरी भाग यामध्ये वैज्ञानिक पद्धतीनेपेक्षा जे पाणी पाहणारे काही व्यक्ती असतात त्याला ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी पाण्या या नावाने संबोधले जाते.

अशा व्यक्तींचा शोध घेतात व त्यांना जमिनीतील पाण्याचा शोध घेण्यासाठी बोलावले जाते. या व्यक्तींच्या जमिनीतील पाणी शोधण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात. यामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारी पद्धत म्हणजे हातावर नारळ ठेवून जमिनीतील पाण्याचा शोध घेणे हे  होय. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने पाणी पाहिल्यानंतर किंवा पाण्याचा शोध घेतल्यानंतर पाणी लागते देखील. परंतु खरंच ही पद्धत वैज्ञानिक आहे का? हे देखील पाहणे गरजेचे आहे. तसेच बऱ्याचदा अशा ठिकाणी पाणी पाहिल्यानंतर देखील विहीर किंवा बोरवेल कोरड्याठाक जातात व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

 हातावर नारळ ठेवून पाणी पाहण्याची पद्धत वैज्ञानिक आहे का?

जर आपण बऱ्याच शेतकऱ्यांचा विचार केला तर जमिनीतील पाण्याचा शोध घेण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना किंवा त्यांच्या टीमला बोलवावे इतका वेळही नसतो आणि पैसा देखील नसतो. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा त्यांच्या शेतामध्ये फिल्ड सर्वेअर आणतात. अशा व्यक्ती जमिनीतील पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धती वापरतात व त्यामध्ये आपण पाहिले तर इंग्रजी वाय अक्षराप्रमाणे दिसणारी कडुनिंबाची काडी, नारळ तसेच पाण्याने भरलेली दोन भांडी अशा गोष्टींचा यामध्ये समावेश केला जातो. तर यामध्ये आपण नारळाची पद्धत पाहिली तर ते पाणी शोधण्याकरिता तळहातावर नारळ ठेवले जाते व नारळाची शेंडी कडचा भाग हा हाताच्या बोटांच्या दिशाला केला जातो.

अशा पद्धतीने हातावर नारळ ठेवून हे व्यक्ती शेतामध्ये फिरतात व ज्या ठिकाणी हातावरील नारळ सरळ उभा राहिला तर जमिनीत पाणी आहे असा एकंदरीत यांचा अंदाज असतो. तसेच आपण वाय आकाराच्या कडुनिंबाच्या काठीचा विचार केला तर साधारणपणे नारळासारखीच पद्धत यासाठी देखील वापरली जाते.

हे कडुनिंबाची काठी हातावर ठेवून शेतात फिरले जाते व ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी ती काठी सरळ राहते. तसेच एका तांब्यामध्ये पाणी घेऊन तो तांब्या हातावर ठेवला जातो व शेतात फिरले जाते. शेतात फिरत असताना ज्या ठिकाणी त्या तांब्यातील पाणी सांडते त्या ठिकाणी विहीर खोदता येते असा देखील यामध्ये प्रघात आहे. परंतु या सगळ्या पद्धती बद्दल जर आपण भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते नारळ किंवा कडुलिंबाच्या फांद्या वगैरे यांचा वापर करून पाणी शोधण्याची पद्धत ही अवैज्ञानिक आहे.

या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते केवळ वैज्ञानिक पद्धतींचा वापर करूनच जमिनीतील पाण्याचा शोध नेमकेपणाने आपल्याला घेता येतो. जमिनीमध्ये जेव्हा पाण्याचे स्त्रोत जास्त प्रमाणात असतात तेव्हा पाणी सहजपणे शोधले जाऊ शकते. त्यामुळे अवैज्ञानिक पद्धतींचा वापर केला तरी जमिनीमध्ये पाणी सापडते.

परंतु बऱ्याच ठिकाणी 800 ते हजार फुटापर्यंत बोरवेल जातात तरी देखील त्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत कमी असल्यामुळे पाणी लागत नाही. अशावेळी वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला तरी देखील पाणी सापडणे कठीण होऊन बसते. यावरून आपल्याला कळते की भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते अशापद्धतीने पाणी शोधणे हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे.

 वैज्ञानिक पद्धती खरच अचूक आहेत का?

साधारणपणे भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी जर वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला तर यामध्ये रेझीस्टीव्हीटी मीटरचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्या मीटरच्या साह्याने जमिनीतील थरातील विद्युतीय प्रतिकारशक्तीचा आपल्याला अंदाज लावता येतो व त्यावर आधारित एक ग्राफ काढला जातो. त्या माध्यमातून जर सकारात्मक परिणाम आहे किंवा नाही हे व्यवस्थित तपासले जाते व त्यानंतरच पाण्याचा शोध घेतला जातो. तसेच संबंधित जमिनीमध्ये पाणी आहे पण ती किती खोल आहे? हे पाहण्याकरिता किंवा ठरवण्याकरिता एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

या पद्धतीमुळे जमिनीतील पहिला थर किती खोल आहे आणि दुसरा त्याच्या किती खोल आहे हे बघितले जाते व त्यानंतर ज्या ठिकाणी कठीण असा खडक आहे त्या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर न खोदता शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी खोदण्याचा निर्णय घेतला जातो. यामध्ये एल रोड पद्धत आणि पेंड्युलम पद्धत देखिल वापरल्या जातात. तसे पाहायला गेले तर या पद्धती वैज्ञानिक नाहीत परंतु या माध्यमातून पाण्याचा प्रवाह नेमका कोणत्या दिशेने वाहत आहे? हे आपल्याला अचूक ओळखता येते. असं देखील भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणतात.

 भूगर्भ शास्त्रज्ञ या जैविक निर्देशकांचा पाणी शोधण्यासाठी करतात वापर

भूगर्भामध्ये पाण्याचा प्रवाह आहे त्याच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न हा बऱ्याच कालावधीपासून केला जातो. आपल्याला माहित असेलच की ज्या ठिकाणी कधी पाणी पोहोचत नाही परंतु बऱ्याचदा वरती जमिनीच्या पृष्ठभागावर एखाद्या ठिकाणी गवत हिरवेगार दिसते व त्या गवताची ठराविक अशी एक दिशा आपल्याला दिसून येते. तरी आपण म्हणतो की या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे. अगदी त्याच पद्धतीने अर्जुन, कदंब, वेत तसेच हस्तीकर्ण, करंजा तसेच बेहळा यासारखे झाडे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी पाणी असते.

त्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञ देखील अशा चिन्हांचा शोध घेतात व त्या ठिकाणी पाण्याची शक्यता जास्त असते असे देखील म्हणतात. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहते त्या ठिकाणी जमिनीत पाण्याचा प्रवाह राहतो हे काही प्रमाणात सिद्ध झालं आहे व या निर्देशांकाचा भूगर्भ शास्त्रज्ञ देखील पाणी शोधण्यासाठी विचार करतात.

 कडुलिंबाची जमिनीतील पाण्याचा संबंध

कडुनिंबाची झाडे देखील पाणी शोधण्यासाठी महत्त्वाची निर्देशक मानली जातात. कडुलिंबाचे झाडे निरोगीपणे वाढत असतील व त्यांच्या फांद्या आणि झाडाची पाने जर एका बाजूला झुकलेली असतील तर त्या ठिकाणी जवळपासच कुठेतरी पाणी आहे असे साधारणपणे मानले जाते. अशा ठिकाणी नेमके उपकरणे कोणत्या ठिकाणी बसवले जातात याला देखील महत्त्व आहे. हे उपकरणे कुठे बसवावेत हे भूवैज्ञानिक त्यांच्या ज्ञानावर आणि अनुभवावर  बसवतात.

बऱ्याचदा जास्त प्रमाणात खडक असतील तर त्यामुळे पाण्याचा शोध लावण्यामध्ये खूप अडचण ठरू शकते. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये भूवैज्ञानिकच पाण्याचा स्त्रोत शोधू शकतात असेदेखील भू शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तर आपण भूजल सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा विचार केला तर ते साधारणपणे 1910 पासून विकसित होत गेलेले आहे त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने शंभर टक्के विश्वास ठेवला जाणे शक्य आहे असे देखील भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.