Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेलं एअर इंडियाचं एक विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या मेघानीनगर परिसरात हा अपघात घडला.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. उड्डाणानंतर विमान कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर काळा धुर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघानीनगर परिसरात अचानक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर धुराचे लोट आकाशात उठताना दिसले. अपघात घडताच बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या सात गाड्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच, आपत्कालीन मदत पथकही लगेच घटनास्थळी दाखल झाले आहे.

#BigBreaking 🚨🚨
गुजरात #Gujarat के अहमदाबाद #Ahmedabad में एक प्लेन क्रैश #Planecrash
हो गया है। हादसा मेघानी नगर में एयरपोर्ट के पास हुआ। हादसे का शिकार हुआ विमान एयर इंडिया #AirIndia एयरलाइन का बताया जा रहा है। प्लेन क्रैश होने के बाद आसमान काले धुएं के गुबार से भर गया है। pic.twitter.com/QuYpZIB6iF— Shruti Pandey 🚩 (@Pandeyshruti252) June 12, 2025
ड्रीमलाइनरमध्ये २४२ प्रवासी; बचावकार्य सुरू
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच भीषण अपघात झाला. मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले असून, अपघातानंतर विमानाने पेट घेतल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात १३० प्रवासी आणि इतर क्रू मेंबर्स मिळून एकूण २४२ लोक उपस्थित होते. विमान कोसळल्यानंतर परिसरात प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विमानातून दाट काळा धूर निघताना स्पष्ट दिसत आहे.
We are following reports of a crash of Air India flight #AI171 from Ahmedabad to London. We received the last signal from the aircraft at 08:08:51 UTC, just seconds after take off.
The aircraft involved is a Boeing 787-8 Dreamliner with registration VT-ANB… pic.twitter.com/EmKKISJldF
— Flightradar24 (@flightradar24) June 12, 2025
सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात तपास सुरू असून, घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक ती माहिती गोळा केली जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, धुराचे भलेमोठे ढग अनेकांनी पाहिले असल्याचं सांगण्यात येत आहे. अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षाने या घटनेची पुष्टी केली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. धारपूर परिसरातूनही धुराचे लोट पाहायला मिळाले असून, या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.दरम्यान ह्या बद्दल एअर इंडिया एअरलाइन्सने ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की हा अपघात अहमदाबादमध्ये झाला आहे. तथापि, हे कसे घडले याचा तपास केला जात आहे.
Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today, 12 June 2025. At this moment, we are ascertaining the details and will share further updates at the earliest on https://t.co/Fnw0ywg2Zt and on our X handle (https://t.co/Id1XFe9SfL).
-Air India…
— Air India (@airindia) June 12, 2025
गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी देखील अपघातस्थळ मेघानीनगरमध्ये असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे. शहरातील सर्व रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले असून, आपत्कालीन सेवा पूर्णपणे सक्रिय आहेत.