Airtel 5G High Speed Internet : मस्तच! आता अनलिमिटेड वापरता येणार Airtel 5G इंटरनेट, अशाप्रकारे तपासा तुमच्या परिसरात 5G नेटवर्क आहे की नाही

Ahmednagarlive24 office
Published:

Airtel 5G High Speed Internet : देशात गेल्या काही महिन्यापूर्वीच अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ आणि Airtel कंपनीकडून देशातील अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.

अनेक शहरातील ग्राहक सध्या 5G इंटरनेट सेवेचा आनंद घेत आहेत. सध्या जिओ आणि Airtel कंपनीकडून ग्राहकांना मोफत 5G इंटरनेट सेवेचा अमर्यादित लाभ दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोफत 5G इंटरनेट सेवेचा आनंद मिळत आहे.

एअरटेल टेलिकॉम कंपनीकडून सध्या त्यांच्या ग्राहकांना मोफत 5G हायस्पीड इंटरनेट सेवेचा आनंद घेण्याचा लाभ दिला जात आहे. जर तुमच्याही भागात किंवा शहरामध्ये 5G हायस्पीड इंटरनेट सुरु झाले असेल तर तुम्ही देखील अमर्यादित 5G इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.

जर तुमच्या शहरामध्ये 5G इंटरनेट सुरु झाले असेल आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येत नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही घरबसल्या 5G इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकता.

एअरटेल वापरकर्त्यांना 4G च्या तुलनेत 20 पट अल्ट्रा फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल

सध्या अनेक शहरांमध्ये 4G सुविधा सुरु आहे. 5G इंटरनेटची चाचणी करण्यासाठी Airtel कंपनीने ग्राहकांना मोफत 5G सुविधा दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना सध्या 20 पट अल्ट्रा-फास्ट अनलिमिटेड इंटरनेट स्पीड मोफत मिळत आहे.

ज्याद्वारे तुम्ही काही सेकंदात 1GB ची फाईल डाउनलोड करू शकाल. Airtel 5G सेवेसह, वापरकर्त्याला सर्वोत्तम व्हिडिओ कॉलिंग गुणवत्ता आणि चांगला आवाज अनुभव मिळेल.

एअरटेलचे 4G सिम 5G इंटरनेटचा लाभ घेऊ शकणार नाही

जर तुम्ही 4G सिम वापरत असाल तर तुम्हाला 5G इंटरनेटचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्हाला 5G इंटरनेटचा लाभ घेईचा असेल तर कंपनीने 4G सिम 5G वर अपग्रेड केले आहे. यासाठी तुम्हाला सिम बदलण्याची गरज नाही. 5G इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी तुमचा स्मार्टफोन 5G असणे आवश्यक आहे.

तुमच्या भागात 5G सेवा सुरू झाली आहे की नाही ते याप्रमाणे तपासा

अनेक शहरांमध्ये Airtel आणि Jio कंपनीकडून 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. जर तुम्हालाही याचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला 5G सेवा सुरु झाली आहे की नाही हे तपासावे लागेल.

हे तपासण्यासाठी तुम्ही एअरटेल थँक्स अॅपवर जाऊन किंवा एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासू शकता, जिथे 5G सेवा सुरू करण्यात आली आहे त्या शहरांची यादी तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या क्षेत्रात 5G सेवा सुरू झाली असेल, तर तुमच्या 5G स्मार्टफोनमध्ये Airtel 5G नेटवर्क दिसायला सुरुवात होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe