अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-शेतकरी आंदोलनाविरोधात ट्वीट केल्याने ट्रोल झालेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन नेमका कोणत्या संघात जातो, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
अखेर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच सहभागी झालेला अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अर्जुनचे नाव चर्चेत होते. अर्जुनची बेस प्राइज ही २० लाख रुपये एवढी होती. मात्र यावेळी अर्जुनला संघात घेण्यासाठी कोणताही संघ उत्सुक नव्हते.
त्यावेळी मुंबईच्याच संघाने अर्जुनला त्याच्या बेस प्राइजलाच आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. त्यामुळे आता अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.
यावेळी अॅडम मिल्ने या वेगवान गोलंदाजाला तब्बल सहा पट जास्त किंमत मोजत मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल करुन घेतले.मिल्नेची बेस प्राइज यावेळी ५० लाख एवढी होती.
आयपीएलच्या लिलावाच्या आधी अर्जुन तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले होते.पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं.
अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच अवघ्या २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे. अर्जुन तेंडुलकर यानं नुकतीच झालेल्या मुश्ताक अली चषकादरम्यान मुंबईच्या संघाकडूव पदार्पण केलं होतं.
यंदा पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. अर्जुन तेंडुलकर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तर वेळप्रसंगी विस्फोटक फलंदाजी करु शकतो.
अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले होते.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved