Vastu Tips : प्रत्येक मानवाच्या जीवनात काही ना काही अडचण नक्कीच असते. मात्र त्यातूनही शांततेने आणि संयम ठेऊन मार्ग काढणे मानवाचे कर्तव्य असते. काही गोष्टी अशा घडतात की त्या पूर्णपणे मानवाला खचून टाकतात. मात्र पैशांची अडचण असेल तर नेहमी माता लक्ष्मी प्रसन्न राहावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आजकाल सर्वांच्याच जीवनात पैसे हा सर्वकाही बनला आहे. त्यामुळे सर्वजण पैसे मिळवण्यासाठी कष्ट करत असतात. मात्र अनेकांच्या घरात पैसे टिकत नाही. अशा लोकांनी वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय करणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीला खुश करायचे असेल तर घरात काही वस्तू तुम्हाला ठेवाव्या लागतील. या वस्तू तुम्ही घरात ठेवल्या तर तुम्हाला कधीही पैशांची चिंता भासणार नाही.
गणपतीची मूर्ती
घरामध्ये नेहमी गणेशजींची मूर्ती असावी. कारण हिंदू धर्मात गणेशजींना खूप महत्व आहे. घराचे मुख्य द्वार दक्षिण किंवा उत्तर दिशेला असेल तर मुख्य गेटवर गणेशाची मूर्ती ठेवावी.
पोपटाची मूर्ती
पोपट तर सर्वांनीच पाहिला असेल. मात्र पोपटाची मूर्ती कुणीही घरात ठेवली नसेल. चिनी संस्कृतीत हे देवत्व आणि शुभ संदेशाचे प्रतीक मानले जाते. जर जोडीदारासोबत मतभेद होत असतील तर बेडरुममध्ये पोपट जोडप्याचा फोटो लावावा.
धावत्या घोड्याची मूर्ती
नशीब चमकवण्यासाठी घरात धावत्या घोड्याची मूर्ती असणे खूप गरजेचे आहे. धावत्या घोड्याची मूर्ती घरामध्ये ठेवल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडतील. उत्तर दिशेला घोड्याची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.
हत्तीची मूर्ती
वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजामध्ये ही मूर्ती ठेवावी. यामुळे सकारात्मक प्रभाव पडतो. ही मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवावी.