Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. यश मिळवण्यासाठी चाणक्यांनी अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा मानवाला आजही उपयोग होत आहे.
वैवाहिक जीवनातील स्त्री पुरुषांना सुखी जीवनासाठी चाणक्य यांनी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा अवलंब केल्याने वैवाहिक जीवनात स्त्री पुरु सुखी होऊ शकतात.
मात्र आचार्य चाणक्य यांच्या धोरणांनुसार मानवाने अनेक ठिकाणहून आल्यानंतर अंघोळ केली पाहिजे अन्यथा जीवनानावर त्याचे वाईट परिणाम होतात. असे चाणक्य नीती मध्ये सांगण्यात आले आहे.
स्मशानभूमीतून आल्यानंतर
माणूस मेल्यानंतर अनेकजण त्याच्या अंतविधीसाठी स्मशानभूमीत जातात. मात्र तेथून परत आल्यानंतर प्रत्येकाने अंघोळ करणे गरजेचे आहे. कारण माणूस मेल्यानंतर त्याच्या अजपासी अनेक जंतू असतात तेच जंतू आपल्या कपड्यावर येऊन चिटकतात आणि घरात पसरतात.
सेक्स नंतर
स्त्री आणि पुरुषांनी सेक्स केल्यानंतर त्यांनी अंघोळ करणे गरजेचे आहे. कारण सेक्स केल्यानंतर संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे जेव्हा संबंध बनवले जातील तेव्हा अंघोळ करणे गरजेचे आहे. अंघोळ केल्याने शरीर निरोगी राहते असे चाणक्यांचे म्हणणे आहे.
तेल मालिश केल्यानंतर
एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीरावर तेलाने मालिश केल्यानंतर स्नान केले पाहिजे. कारण शरीरावर तेल मसाज केल्यावर रक्ताभिसरण जलद होते आणि छिद्रांमधून घाम येऊ लागतो, त्यामुळे तेल मालिश केल्यानंतर आंघोळ करावी.
केस कापल्यानंतर
जेव्हाही तुम्ही केस कापून घरी याला तेव्हा आंघोळ करायला विसरू नका, केस शरीराला चिकटून राहतात आणि आंघोळीशिवाय ते शरीरातून बाहेर पडत नाहीत. लहान व बारीक केस पोटात गेल्यास शारीरिक वेदना होतात.