Electric Scooters : भन्नाट ऑफर! ओला ते एथर इलेक्ट्रिक स्कूटरवर 17000 हजारांची बंपर सूट, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Scooters : देशात महागाई वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाच्या किमती अधिक वाढल्याने अनेकांचा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा कल वाढला आहे. तसेच दिवसेंदिवस अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात सादर होत आहेत.

जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर बंपर सूट मिळत आहे. त्यामुळे पैशांची देखील बचत होत आहे. ओला ते एथर इलेक्ट्रिक स्कूटरवर 17000 हजारांची सूट दिली जात आहे.

Ather Energy

Ather Energy ही भारतातील तिसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. याकम्पनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर वर ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही Ather Energy इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तुम्हाला १७ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. Ather 450 आणि Ather 450X सारख्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर मिळत आहे.

ओला इलेक्ट्रिक

सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी म्हणून ओला दुचाकी कंपनीला ओळखले जाते. या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. कंपनीकडून Ola S1 Pro स्कूटर खरेदीवर ऑफर दिली जात आहे. कंपनीकडून या स्कूटरवर 16,000 रुपयांची ऑफर दिली जात आहे.

Okinawa

Okinawa कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 8,750 रुपयांची सूट दिली जात आहे. सरकारकडून या स्कूटरवर सबसिडी दिली जात होती. मात्र आता नवीन स्कूटर खरेदीवर सबसिडी दिली जाणार नाही.

Jitendra EV

जर तुम्हाला बजेट इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही जितेंद्र EV ची इलेक्ट्रिक स्कूटर वापरून पाहू शकता. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर कंपनी 6,000 रुपयांची सूट देत आहे. जितेंद्र ईव्हीला सबसिडी देणेही सरकारने बंद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe