Honda Bike : आजकाल सर्वांचे स्वतःच्या मालकीची बाईक असण्याचे स्वप्न असते. मात्र कमी बजेटमुळे अंकेजन बाईक खरेदी करू शकत नाहीत. हेच कारण लक्षात घेता अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. तसेच कमी किमतीमध्ये बाईक खरेदी करण्याची देखील संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
जर तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्हाला बाईक खरेदी करायची आहे तर काळजी करू नका. तुम्ही होंडा कंपनीची CB300F बाईक फक्त 11,311 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीकडून या बाईकमध्ये अनेक दमदार फीचर्स देखील देण्यात आली आहेत.
होंडा CB300F बाईक वर कंपनीकडून डाउन पेमेंट EMI सुविधा दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. कमी बजेट असणारे ग्राहक देखील या सुविधेमुळे बाईक खरेदी करू शकतात.
EMI सुविधा
CB300F ही बाईक लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे किंवा ही एक पेट्रोल मॉडेल बाईक आहे ज्यामध्ये कूलिंग सिस्टम ऑइल प्रकार देण्यात आले आहे. ही बाईक 6 गिअर्ससह येते. त्याचे इंजिन 24.13 bhp ची कमाल पॉवर जनरेट करते.
उत्तम फीचर्स
या बाईकमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ब्रेकिंग सिस्टीममध्ये ड्युअल-चॅनल एबीएसची सुविधा देण्यात अली आहे.
फ्रंट सस्पेन्शनला टेलिस्कोपिक आणि मागील सस्पेन्शनमध्ये मोनोशॉक देण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल ओडोमीटर, मोबाइल कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट अशा विविध वैशिष्ट्यांचाही समावेश आहे.
किंमत आणि EMI प्लॅन
होंडा CB300F बाईक दोन मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये CB 300F Deluxe Pro आणि CB 300F Deluxe यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 2,26,217 आणि 2,29,217 रुपये आहे.
तुम्ही ही बाईक फक्त 11311 च्या डाउन पेमेंटवर देखील खरेदी करू शकता. फायनान्स कंपनीकडून तुम्ही ३६ महिन्यांमध्ये परतफेडीची सुविधा मिळवू शकता. दरमहा तुम्हाला ७६७१ हफ्ता भरावा लागेल.