Flipkart Big Saving Days 2023 : प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक ई-वेबसाइटवर भन्नाट ऑफर्स लागल्या आहेत. फ्लिपकार्टवर तुम्हाला आयफोन खूप कमी किमतीमध्ये मिळू शकतो. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सुरू आहे.
हा सेल १५ जानेवारीपासून सुरु झाला आहे. तसेच २० जानेवारीला हा सेल संपणार आहे. तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न या सेलमध्ये पूर्ण होऊ शकते. कारण ६० हजारांचा आयफोन फक्त १८ हजारांमध्ये मिळू हसकतो.
कमी बजेट असणाऱ्यांना आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामध्ये तुम्हाला खूप स्वस्तात आयफोन मिळू शकतो.
ऑफर
आयफोन 12 मिनीसाठी फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर लागली आहे. या फोनची किंमत 59,900 रुपये आहे. फ्लिपकार्टवर 38,999 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. २० हजारांची सूट मिळत आहे. तसेच बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफेरमुळे आणखी कॅम्प किमतीत हा फोन मिळत आहे.
बँक ऑफर
जर तुम्ही आयफोन १२ मिनी खरेदी करण्यासाठी ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 37,999 रुपये असेल.
एक्सचेंज ऑफर
iPhone 12 mini वर 20 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला आणखी सूट मिळेल. पण तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तेव्हाच 20 हजारांची सूट मिळेल. तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात यशस्वी झाल्यास फोन फक्त रु. 17,999 रुपयांमध्ये मिळेल.