Cibil Score : सिबिल स्कोअर हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. बँकेसंबंधित काही काम असेल तर अनेकदा तुम्हाला हा शब्द कानावर पडेल. जर तुम्हाला कर्ज घेईचे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे गरजचे आहे. जर तुमचा सिबिल ७५० हुन कमी असेल तर बँक तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करेल
जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर बँक तुम्हाला अनेकदा कर्ज देण्यास नकार देते. मात्र जरी आता तुमचा सिबिल स्कोअर खराब असला तरीही तुम्हाला कर्ज मिळू शकते. सिबिल स्कोअरशिवाय तुम्ही आता कर्ज घेऊ शकता.
कर्ज घेत असताना क्रेडिट स्कोअर व्यतिरिक्त, सर्व वित्तीय संस्था कर्ज देताना तुमचा पगार देखील तपासून पाहत असतात. जर तुमचा सिबिल स्कोअर मजबूत बनवायचा असेल तर तुम्ही काही रक्कम नियमितपणे तुमच्या खात्यावर टाकू शकता. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर वाढेल.
जरीही तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर काळजी करू नका. कारण वैयक्तिक कर्ज मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याद्वारे तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकते. पण असे कर्ज घेत असताना फसवणूक होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
तुमचा सिबिल स्कोअर पाहण्यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच बँकेमध्ये जाऊन सिबिल स्कोअर कसा वाढवता येईल याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता.
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) तुम्हाला 300 ते 900 पॉइंट्स दरम्यान गुण नियुक्त करते. तुमच्या बँकेतील व्यवहारावर तुमचा सिबिल स्कोअर ठरतो.
क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. बँका 750 किंवा त्याहून अधिक स्कोअर चांगला मानतात. तुमचा CIBIL स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असेल तर ठीक आहे. विशेष म्हणजे, तुमचा स्कोअर जितका जास्त असेल तितकी तुमची कर्ज मंजूरीची शक्यता जास्त असते.
कर्ज घेत असताना बँकेकडून तुमचा सिबिल स्कोअर सर्वात प्रथम पाहिला जातो. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर नियमित क्रेडिट कार्ड बिल, तसेच बँक खात्यातील शिल्लक, आणि बँकेतील आर्थिक व्यवहार हे सर्व व्यवस्थित हाताळावे लागेल.
तुम्ही प्रत्येक व्यवहारासाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरू नका. तुम्ही तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो ३०% किंवा त्यापेक्षा कमी ठेवावे. या गोष्टी तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम करतात.