आजकाल जगात काय घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. आज मुलांना, विद्यार्थ्यांना घडवताना पालकांना, शिक्षकांना मोठी कसरत करावी लागते. हे करत असताना बऱ्याचदा मुले आता तक्रार करू लागल्याने शिक्षकांसह पालकांचीही गोची होऊ लागली आहे.
आता एक घटना समोर आली आहे. ही घटना सर्वानाच अचंबित करणारी आहे. मुलांनी थेट पोलीस ठाणे गाठत आपल्या आई वडिलांविरोधात ७ वर्षे शिक्षेचे कलम लावलेत. ते देखील टीव्ही-मोबाइल पाहू देत नसल्याने. तुम्हालाही हे ऐकून धक्का बसला असेल.
अशा प्रकारे गुन्ह्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असावी असे म्हटले जात आहे. ही घटना सविस्तर जाणून घेऊयात –
मुलांना सतत टीव्ही-मोबाइल पाहायला घरात आई वडिलांकडून होणारी मनाई इंदूरच्या चंदननगरमधील एका कुटुंबातील मुलांना नापसंत होती. त्यांच्याविरोधात त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीदेखील २१ वर्षीय मुलगी आणि ८ वर्षांच्या मुलाचे गाऱ्हाणे ऐकून आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध एक ते सात वर्षे शिक्षेची तरतूद असलेली कलमेही नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात संपूर्ण चौकशी करून आई-वडिलांच्या विरुद्ध चलानही सादर केले आहे. तूर्त उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीस अंतरिम स्थगिती दिली आहे.
दरम्यान, सर्वात आधी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुले ठाण्यात गेली व रागावल्याबद्दल तक्रार दाखल केली. पोलिसांनी आई तसेच वडिलांवर कलम ३४२, २९४, ३२३ आदी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती समजली आहे.
लावलेले कलम लावले आणि त्याबद्दल शिक्षेची तरतूद
३४२ : एखाद्याला ओलीस ठेवणे
शिक्षा : सामान्य तुरुंगवास. ही शिक्षा एक वर्ष वाढवता येते. १ हजार दंड किंवा दोन्ही शक्य.
२९४ : कोणाबद्दल अभद्र किंवा अश्लील भाषेचा वापर करणे.
शिक्षा :तीन महिन्यांपर्यंत वाढवता येईल, अशी कैद किंवा त्याबद्दल दंड लागू केला जाऊ शकतो किंवा दोन्ही भोगावे लागू शकते.
३२३: पुरुषाने एखाद्या महिलेस व्यभिचाराची धमकी देणे.
शिक्षा : दोषीस ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.