इंडिगो चे विमान क्रमांक 6E-5384. मुंबईहून हैदराबादला जात होते. विमान तब्बल 23 हजार फूट उंचीवर होते.
मात्र याचवेळी अचानक एका इंजिनमधून मोठा आवाज येऊ लागला.
प्रवाश्यांना विमानात धक्के जाणवण्यास सुरवात झाली,एक इंजिन बंद करावे लागले आणि विमानात काही अडचण आहे हे समजल्याने प्रवाशी ही घाबरू लागले.
विमानात दोन दोन इंजिन असतात जर एक इंजिन बंद पडले तरी विमान दुसर्या इंजिनवर आपत्कालीन लँडिंग करू शकते. दुसर्या इंजिनच्या मदतीने वैमानिकाने पहाटे १.39 वाजता मुंबईत लँडिंग केले. यावेळी विमानात 95 प्रवासी होते.
जेव्हा विमानाच्या इंजिनमध्ये ही समस्या उद्भवली, तेव्हा विमान सुरु होवून एक तासही झालेला नव्हता,दरम्यान आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशांना दुसर्या विमानाने हैदराबादला पाठविण्यात आले.
इंडिगो च्या विमानांमध्ये में प्रैट एंड विटनी (PW) इंजिनाचा वापर करण्यात येतो, धक्कादायक म्हणजे गेल्या दोन वर्षांत इंडिगो पीडब्ल्यू इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे हे 22 वे प्रकरण आहे.
विमानाच्या आपत्कालीन लँडिंगनंतर इंजिनचे निरीक्षण केले गेले. त्यातून इंजिन क्रमांक -1 मधील टर्बाईन नंबर -3 खराब झाल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे, ही समस्या आली असल्याचे सांगण्यात आले. या इंजिनने सुमारे 4006 तास काम केले होते. तर दुसर्या इंजिनने ही सुमारे 1200 तास काम केल्याची माहिती समोर आली आहे.