Electric Bike : बजेटमधील भन्नाट इलेक्ट्रिक बाईक! फुल चार्जमध्ये धावणार 90 किमी; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Published on -

Electric Bike : भारतीय बाजारात अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अनेक ऑटो क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी अधिक प्राधान्य देत आहेत. सध्या बाजारातही अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत.

जर तुम्ही इंधनावरील बाईकला कंटाळला असाल तर काळजी करू नका. बाजारात अशी एक बाईक आली आहे जी सिंगल चार्जमध्ये ९० किमीचे अंतर कापू शकते. त्यामुळे आता पेट्रोलपासून मुक्तता होईल. ही बाईक तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Komaki MX3 इलेक्ट्रिक बाइकला 90 किमीची रेंज मिळते

Komaki MX3 इलेक्ट्रिक बाइक ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक बाइक्सपैकी एक आहे. ही बाईक जर तुम्ही एकदा फुल चार्ज केली तर जवळपास ९० किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

या बाईकमध्ये तुम्हाला लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच यामध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तास वेळ लागतो.

वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ मोबाईल कनेक्टिव्हिटी, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटन स्टार्ट, रिव्हर्स असिस्ट, घड्याळ, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी आदी सुविधा मिळतील.

टर्न सिग्नल लॅम्प, अँटी थेफ्ट लॉक, मल्टिपल सेन्सर्स, सेल्फ डायग्नोज, व्हिव्हिड स्मार्ट डॅशबोर्ड, मल्टिपल राइडिंग मोड्स आणि कमी बॅटरी इंडिकेटर आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

बाइकची किंमत

सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहने सादर होत आहेत मात्र त्याच्या किमती देखील खूपच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ती खरेदी करता येत नाहीत. पण ही इलेक्ट्रिक बाईक तुम्ही कमी बजेटमध्ये देखील खरेदी करू शकता.

इतर इलेक्ट्रिक बाईकच्या तुलनेत ही बाईक खूपच स्वस्त मिळत आहे. भारतीय बाजारपेठेत जवळपास ९०,००० रुपये एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. ती भारतीय बाजारपेठेतील रिव्हॉल्ट RV 3000 इलेक्ट्रिक बाइकशी थेट स्पर्धा करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News