ना युद्ध, ना भूकंप 2025 मध्ये जगावर कोसळणार ‘डिजिटल संकट’?; बाबा वेंगांचं भाकीत

बाबा वेंगांनी भाकीत केलेलं संकट आता समोर येतंय.ना महायुद्ध, ना भूकंप, तर AI आणि सायबर क्राइममुळे मानवतेवर मोठं संकट कोसळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published on -

Baba Vanga AI Warning | जगप्रसिद्ध अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या थरकाप उडवणाऱ्या भाकितांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक आश्चर्यजनक गोष्टींची भविष्यवाणी केली होती — हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवरचा हल्ला हे त्यातील काही उल्लेखनीय घटनांचे अंदाज होते, जे प्रत्यक्षात घडल्याचं अनेक समर्थक मानतात.

आता बाबा वेंगांचं 2025 वर्षासाठीचं एक नवं भाकीत समोर आलं आहे, ज्यामध्ये त्यांनी महायुद्ध, महाभूकंप, आणि रोगराईसह एक अजून गंभीर संकटाची शक्यता वर्तवली आहे आणि ते संकट आहे सायबर क्राइम आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता).

काय केलं भाकीत?

वेंगांनी भविष्यवाणी केली होती की, मानवाने विकसित केलेलं एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञान भविष्यात सर्व कामं सुलभ करेल, पण हाच शोध नंतर मानवतेसाठी सर्वात मोठं संकट ठरेल. त्या काळात AI चा उल्लेख नसला तरी हे भाकीत आजच्या AI च्या युगाशी थेट जुळतं.

सायबर क्राइमचं वाढतं प्रमाण, हॅकिंग, गोपनीय माहितीची चोरी, आणि AI द्वारे चुकीची माहिती पसरवणं यामुळे जगभरात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. बाबा वेंगांचं हे भाकीत एखाद्या इशाऱ्यासारखं वाटू लागलं आहे.

AI ठरणार ‘मानवतेचा शत्रू’?

आणखी चिंतेची गोष्ट म्हणजे त्यांनी 2025 मध्येच जगाच्या अंताची सुरुवात होईल असंही भाकीत केलं होतं. त्यामुळे सायबर क्राइमच्या वाढत्या धोक्यामुळे आर्थिक व्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षेच्या यंत्रणा, आणि वैयक्तिक गोपनीयता यांच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा अनेक तज्ज्ञही देत आहेत.

वेंगांच्या या नवीन भाकितामुळे सर्वसामान्यांपासून ते सरकारपर्यंत अनेक स्तरांवर सतर्कतेची गरज निर्माण झाली आहे. आज AI जितकी उपयुक्त आहे, तितकीच नियंत्रणाच्या बाहेर गेल्यास घातक ही ठरू शकते, हे बाबाचं भाकीत अधोरेखित करतंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News