Bajaj Chetak Electric : भारतीय ऑटो बाजारात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर लॉन्च होत आहेत. वाढत्या इंधनाच्या किमती पाहता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. आता बजाज ऑटोकडून चेतक ई-स्कूटर नवीन रूपात लॉन्च केली जाणार आहे.
बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत मात्र ग्राहकांकडून त्याबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. मात्र बजाज कंपनीने बनवलेली चेतक ई-स्कूटर ही ग्राहकांची आवडती इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे.
चेतक ही ई-स्कूटर मजबूत आणि स्टायलिश बनवण्यात आली आहे. तसेच ही स्कूटर जबरदस्त रेंज देत असल्याने ग्राहकही या स्कूटरकडे चांगलेच आकर्षित होत आहेत. आता कंपनीकडून चेतक ई-स्कूटर नवीन रूपात लॉन्च केली जाणार आहे.
नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक रेंज
सध्या बजाज कंपनीची चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. मात्र आता कंपनीकडून नवीन फीचर्स आणि अधिक रेंजसह चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेली चेतक इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर ९० किमी पर्यंत रेंज देत आहे. तर नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 108 किमती पर्यंत रेंज देऊ शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे.
किंमत
सध्या बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.52 लाख रुपये आहे. कंपनीकडून नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.70 लाख पर्यंत ठेवण्याची शक्यता आहे.