Bajaj Chetak Electric Scooter : बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ठरतेय सर्वांची बाप, खरेदीसाठी लोकांच्या रांगा; जाणून घ्या खासियत

Ahmednagarlive24 office
Published:

Bajaj Chetak Electric Scooter : ऑटो क्षेत्रात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर सादर झाल्या आहेत. मात्र बाजारात बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आता इतर कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला चांगलीच टक्कर देत आहे.

आता कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकही या स्कूटरकडे चांगलेच आकर्षित होत आहेत.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बजाज इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ही इलेक्ट्रिक स्कूटर मजबूत आणि जबरदस्त रेंजसाठी बनवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 50.4 V, 60.4Ah लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.

4080W च्या BLDC तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक मोटर स्कूटरमध्ये वापरण्यात आली आहे. स्कूटरमधील बॅटरी चार्जसाठी लावली तर ती ५ तासांत पूर्ण चार्ज होते. सिंगल चार्जमध्ये ती ९५ किमीचे अंतर पूर्ण करू शकते. ताशी 63 किलोमीटरचा टॉप स्पीड कंपनीकडून देण्यात आला आहे.

किंमत

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,51,958 रुपये निश्चित केली आहे, ऑन-रोड कंपनीने त्याची किंमत 1,57,943 रुपये दिली आहे.

स्पेशल ऑफर

कंपनीकडून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग करण्यासाठी टोकन रक्कम खूपच कमी ठेवण्यात आली आहे. फक्त २ हजार रुपये भरून तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता. जर तुम्ही बुकिंग रद्द केले तर तुम्हाला फक्त १ हजार रुपये माघारी दिले जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe