Bank Holidays April 2023 : भारताचे नवीन आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरु होते. अनेकांना या नवी वर्षातील पहिल्या महिन्यामध्ये अनेक आर्थिक कामे असतात. त्यामुळे आर्थिक कामांसाठी मार्च आणि एप्रिल महिना खूप महत्वाचा मानला जातो. मात्र यंदाच्या एप्रिल महिन्यात बँकांना खूपच सुट्ट्या आल्या आहेत.
जर तुम्हीही नवीन आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्यात बँकेसंबंधी काही आर्थिक काम आखले असेल तर आरबीआयकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ती पाहूनच तुम्ही एप्रिल महिन्यात बँकेसंबंधी कामे ठरवावीत.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील सर्व बँकांच्या एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जर तुमचे काही बँकेमध्ये काम असेल तर तुम्ही नक्कीच एकदा सुट्ट्यांची यादी तपासून पहा.
बँका बंद राहिल्या तर आर्थिक कामे कशी होणार?
एप्रिल महिन्यात बँकांना अधिक सुट्ट्या असल्याने सुट्ट्यांमुळे आर्थिक कामात व्यत्यय येऊ शकतो, परंतु नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग यासारख्या ऑनलाइन सुविधा कार्यरत राहतात, ज्यामुळे ग्राहकांना खात्यांमध्ये व्यवहार करता येतो. UPI हा देखील सोपा मार्ग आहे.
एप्रिल 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी
1. 1 एप्रिल , 2023 (शनिवार): बँक खाते वार्षिक बंद करणे
2. 2 एप्रिल 2023 (रविवार): सुट्टी
3. 4 एप्रिल 2023 (मंगळवार) – महावीर जयंती निमित्त सुट्टी
4. 5 एप्रिल 2023 (बुधवार) – बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन
5. 7 एप्रिल 2023 (शुक्रवार) – गुड फ्रायडे सुट्टी
6. 8 एप्रिल 2023 (शनिवार) – महिन्याचा दुसरा शनिवार
7. 9 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी
8. एप्रिल 14, 2023 (शुक्रवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती / बोहाग बिहू / चिराओबा / बैसाखी / बैसाखी / तामिळ नववर्ष दिन / महा बिसुभा संक्रांती / बिजू उत्सव / बिसू उत्सव
9. एप्रिल 15, 2023 (शनिवार) – विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिवस / बंगाली नववर्ष दिवस
10. 16 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी
11. 18 एप्रिल 2023 (मंगळवार) – शब-ए-कद्र निमित्त सुट्टी
12. 21 एप्रिल 2023 (शुक्रवार) – ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा सुट्टी
13. 22 एप्रिल 2023 (शनिवार) – महिन्याचा चौथा शनिवार आणि रमजान ईद (ईद-उल-फित्र)
14. 23 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी
15. 30 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी