Bank Holidays : एप्रिलमध्ये बँकांना बक्कळ सुट्ट्या! १५ दिवस बँका राहणार बंद, पहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays : सध्या आर्थिक वर्ष 2022-23 चा शेवटचा महिना सुरु आहे. लवकरच नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. मात्र ज्या एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे त्या महिन्यातच बँकांना १५ दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेसंबंधी कामे लवकरात लवकरच उरकून घ्यावी.

तुमचेही नवीन आर्थिक वर्षात जर काही आर्थिक कामे असतील तर ती लवकरच करून घ्या अन्यथा तुम्हाला आर्थिक व्यवहारासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहूनच तुम्ही एप्रिल महिन्यात बँकेसंबंधी कामे ठरवावी.

एप्रिल 2023 मध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे देशातील सर्व बँकांचे नियंत्रण ठेवले जाते. तसेच RBI च्या नियमानुसार सर्व बँका काम करत असतात. RBI कडून सर्व बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.

RBI च्या आदेशानुसार बँकेला एप्रिलमध्ये 15 दिवसांची सुट्टी असेल. या सुट्ट्यांच्या यादीमध्ये शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात तुम्हाला बँकेच्या सुट्टयांव्यतिरिक्त कामे करावी लागतील.

४ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी

एप्रिल महिन्यातील पहिली सुट्टी १ एप्रिल रोजी बँक खाती वार्षिक बंद झाल्यापासून सुरू होईल. 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असेल. संपूर्ण महिनाभर बँकेच्या कामकाजात कोणतीही अडचण येणार नाही. या कालावधीत एटीएम, रोख ठेव, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुरू राहतील. वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या बदलू शकतात.

एप्रिल 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी

1. 1 एप्रिल , 2023 (शनिवार): बँक खाते वार्षिक बंद करणे
2. 2 एप्रिल 2023 (रविवार): सुट्टी
3. 4 एप्रिल 2023 (मंगळवार) – महावीर जयंती
4. 5 एप्रिल 2023 (बुधवार) – बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन
5. 7 एप्रिल 2023 (शुक्रवार) – गुड फ्रायडे
6. 8 एप्रिल 2023 (शनिवार) – महिन्याचा दुसरा शनिवार
7. 9 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी
8. एप्रिल 14, 2023 (शुक्रवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती / बोहाग बिहू / चिराओबा / बैसाखी / बैसाखी / तामिळ नववर्ष दिन / महा बिसुभा संक्रांती / बिजू उत्सव / बिसू उत्सव
9. एप्रिल 15, 2023 (शनिवार) – विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिवस / बंगाली नववर्ष दिवस
10. 16 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी
11. 18 एप्रिल 2023 (मंगळवार) – शब-ए-कद्र
12. 21 एप्रिल 2023 (शुक्रवार) – ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा
13. 22 एप्रिल 2023 (शनिवार) – महिन्याचा चौथा शनिवार आणि रमजान ईद (ईद-उल-फित्र)
14. 23 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी
15. 30 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe