२७ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : मार्च महिन्यात वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात एकूण १४ दिवस बँका बंद असणार आहेत.त्या सुट्ट्यांमध्ये ५ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार आहे.१४ मार्चला होळी आणि ३१ मार्चला ईद-उल-फितर हे दोन मोठे सण आहेत म्हणून त्या दिवशीसुद्धा बँका बंद असणार आहेत.मार्चमध्ये १२ दिवस शेअर बाजार सुद्धा बंद असणार आहे.
जर तुम्हाला बँकेतीळ कोणतीही महत्त्वाची कामी करायची असतील तर या सुट्टीच्या तारखांचा विचार करून पुढचे नियोजन करा.बँकेला जरी सुट्टी असेल तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन बैंकिंग, एटीएमचा वापर करून व्यवहार आणि इतर कामे करता येतील.या सुविधांवर बँकांच्या सुट्टीचा कोणताही परिणाम होणार नाही.

कोणत्या कारणांमुळे, कुठे होणार नाहीत व्यवहार ?
तारीख – सुटीचे कारण – सुटी कुठे पुढीलप्रमाणे
२ मार्च – रविवार – देशभर
७ मार्च – चापचर कुट फेस्टिव्हल – आयझॉल
८ मार्च – दुसरा शनिवार – देशभर
९ मार्च – रविवार – देशभर
१३ मार्च – होलिका दहन – देहराडून, कानपूर, लखनौ, रांची आणि तिरुवनंतपुरम
१४ मार्च – होळी – देशभर
१५ मार्च – या ओशांगचा दुसरा दिवस – इंफाळ, आगरतळा, भुवनेश्वर, पाटणा
१६ मार्च – रविवार – देशभर
२२ मार्च – चौथा शनिवार – देशभर
२३ मार्च – रविवार – देशभर
२७ मार्च – शब-ए-बरात – जम्मू आणि श्रीनगर
२८ मार्च – जुमात-उल-विदा – जम्मू आणि श्रीनगर
३० मार्च – रविवार – देशभर
३१ मार्च – ईद-उल-फितर – देशभर