Kidney Damage : लवकरच व्हा सावध! दारूनेच नाहीतर या गोष्टींचे सेवन केल्याने किडनी होईल खराब…

Ahmednagarlive24 office
Published:

Kidney Damage : धावपळीच्या जीवनात अनेकांना आरोग्याकडे लक्ष देईला वेळ नाही. त्यामुळे आजकाल कमी वयात अनेकांना गंभीर आजार होत आहेत. तसेच दारूचे सेवन केल्याने किडनीच्या समस्या उद्भवतात. मात्र फक्त दारू पिऊनच नाही तर इतर अनेक गोष्टींनीही किडनी खराब होऊ शकते.

किडनी हा एक शरीराचा नाजूक आणि महत्वाचा पार्ट आहे. आडाणी निरोगी राहणे हे शरीरासाठी खूप गरजेचे आहे. शरीरातील विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकण्याचे काम किडनी करत असते.

लघवीद्वारे किडनी शरीराला नको असलेले पदार्थ काढून टाकते. किडनी पाण्याच्या फिल्टरसारखे काम करत असते. तसेच रक्तदाबही सुरळीत ठेवण्याचे काम करते.

मूत्रपिंडाचे कार्य?

किडनी शरीरातील नको असलेली घाण बाहेर काढते. किडनीचा त्रास लगेच जाणवत नाही. हळूहळू त्याचा त्रास जाणवू लागतो. ज्यांना असा त्रास होत आहे अशा लोकांनी आहारात बदल करणे गेजेचे आहे.

मूत्रपिंड निकामी होण्याची प्रारंभिक लक्षणे

भूक न लागणे
शरीरावर सूज येणे
अति थंडी वाजणे
त्वचेवर पुरळ उठणे
लघवी करण्यात अडचण
चिडचिड

किडनीला हानी पोहोचवणाऱ्या ५ गोष्टी

1. मीठ

जास्त मीठ खाणे शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही कमी मीठ खाण्यास सांगत असतात. मीठामध्ये सोडियम किंवा पोटॅशियम असते, शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण योग्य राखते, परंतु अन्नामध्ये जास्त मीठ घेतल्यास ते द्रवपदार्थाचे प्रमाण वाढवते.

2. दारू

दारूचे सेवन करणे शरीरासाठी घटक आहे. यामुळे लवकरच किडनी खराब होऊ शकते. दारूचा किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनीच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

3. दुग्धजन्य पदार्थ

तुम्हीही दुधापासून बनवलेले पदार्थांचे सेवन करत असाल तर ते तुमच्या किडनीसाठी धोकादायक आहे. दूध, चीज, पनीर, लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन मूत्रपिंडासाठी चांगले नाही. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे किडनी खराब होतात.

4. कृत्रिम स्वीटनर

बाजारात उपलब्ध असलेल्या मिठाई, कुकीज आणि पेयांमध्ये कृत्रिम स्वीटनरचा अधिक वापर केला जातो, जो किडनीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यांना किडनीशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांनी त्याचा कधीही वापर करू नये.

5. लाल मांस

लाल मांसामध्ये भरपूर प्रथिने असतात, परंतु आपल्या शरीरासाठी प्रथिने देखील आवश्यक असतात. आपल्या शरीराला असे मांस पचणे कठीण होते, ज्यामुळे किडनीवर परिणाम होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe