Chanakya Niti : आजकाल सर्वांच्याच जीवनात पैसा हा महत्वाचा घटक बनला आहे. पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य आहे. त्यामुळे सर्वजण पैसे कमावण्यात व्यस्त आहेत. मात्र काही लोक पैसे येताच या चुका करतात त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा दारिद्र्य येत.
पैसे कमवण्यासाठी आणि टाकण्यासाठी अनेकांचे नशीब कारणीभूत ठरत असते. मात्र अनेकांना नशिबाने साथ दिल्यानंतर वेगळी बुद्धी सुचते आणि नको तिथे पैसे खर्च करतात त्यामुळे माता लक्ष्मी देखील त्यांच्यापाशी थांबत नाही.
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथात मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मानवाला मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. तसेच श्रीमंत माणूसही काही चुकीच्या गोष्टीमुळे पुन्हा गरीब बनू शकतो हेही चाणक्यांनी सांगितले आहे.
प्रत्येकजण पैसे कमावत आहे. काही जण चांगल्या मार्गांनी, कष्टाने तर काही जण चुकीच्या मार्गांनी पैसे कमावत आहे. मात्र चाणक्यांनी नेहमी कष्टाने पैसे कमवायला सांगितले आहेत. काही चुकीच्या गोष्टींमुळे माता लक्ष्मी नाराज होऊन तुमच्याकडील धनदौलत जाऊ शकते.
पैशांचा अपव्यय टाळायचा असेल तर या कामांपासून दूर राहा
माणसाने जीवनात कितीही पैसे कमावले तरीही त्याने मागील दिवस विसरता कामा नये. ज्या कठीण दिवसांतून कष्ट करून पैसे कमावले आहेत त्या दिवसांचा नेहमी धडा घ्या. अन्यथा गरिबी येण्यासाठी काही ठरविक वेळच पुरेसा आहे.
माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, त्याने प्रत्येक परिस्थितीत नम्र राहावे. पैसा आल्यानंतर, बोलण्यात आणि वृत्तीत बदल केल्याने तो पुन्हा कंगाल होऊ शकतो. जे कडवट बोलतात, इतरांचा अपमान करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी रागावते.
माणूस कितीही श्रीमंत झाला तरीही त्याने नेहमी इतरांशी नम्रपणे वागले पाहिजे. अहंकार आला तर माता लक्ष्मी देखील अशा लोकांपाशी राहणे पसंत करत नाही.
वाईट सवयी माणसाला खूप लवकर कंगाल करतात. नशा, जुगार, फसवणूक यासारख्या सवयींच्या चक्रात माणूस रात्रंदिवस पैसा खर्च करतो. असा माणूस करोडपती असला तरी त्याला रस्त्यावर यायला फारसा वेळ लागत नाही. हे लक्षात येईपर्यंत तो पैशावर अवलंबून असतो.