बेस्ट सरकारी निर्णय! त्या विद्यार्थ्यासाठी परिवहन विभागाने बदलली बसची वेळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-ओडिशामधील परिवहन विभागाने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.त्यांनी त्यांच्या बसचा टाइम एका विद्यार्थ्यांसाठी बदलला आहे.

त्यांच्या या निर्णयाचे सोशल माध्यमावरून कौतुक करण्यात आले.विद्यार्थ्याच्या शाळेचा टाइम आणि बसचा टाइम वेग वेगळा होता. त्यामुळे त्याला शाळेत जायला उशीर होत असे.

त्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ओडिशाच्या परिवहन विभागाने त्या बसचा टाइम बदलला आहे.त्या विद्यार्थ्यांचे नाव साई आवेश अमृतां प्रधान असं आहे.त्याच्या सोयीसाठी बसची वेळ बदलवण्यात आली.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार साई आवेश अमृता प्रधान नावाच्या विद्यार्थ्याने राज्य परिवहन विभागाकडे बसची वेळ बदलण्याची विनंती केली होती.

साइने केलेल्या ट्विटला लगेच पलीकडून आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.त्यांनी घेतलेल्या या नेण्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. यासंबंधित वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment