Best Power Banks : आजकालच्या पिढीला स्मार्ट गॅजेटशिवाय वेळ घालवणे कठीण आहे. तसेच देशात दिवसेंदिवस अनेक आधुनिक बदल होत आहे. स्मार्टवॉचपासून ते स्मार्टफोन हे सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन्स पाहायला मिळत आहेत.
पण प्रत्येक स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे काही स्मार्टफोनची चार्जिंग दिवसभर टिकते तर काही स्मार्टफोनची चार्जिंग टिकत नाही. त्यामुळे अनेकदा स्मार्टफोन चार्जिंग करण्याची गरज भासते.
जर चार्जिंगची सुविधा असेल तर तुम्ही स्मार्टफोन चार्जिंग करू शकता. अन्यथा तुमचा मोबाईल चार्जिंग संपली की बंद होईल. त्यामुळे अनेकजण पॉवर बँक्स वापरत असतात. त्यामुळे स्मार्टफोन सहजरित्या चार्ज करता येतो.
पॉवर बँक खरेदी करायला गेल्यानंतर अनेक पॉवर बँक तुम्हाला आढळून येतील. पण त्यातील काही जास्त बॅटरी असणारेच पॉवर बँक तुम्हाला निवडावे लागतील जेणेकरून तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज होईल.
आज भारतातील स्वस्त आणि 20,000mAh बॅटरीसह येणाऱ्या पॉवर बँकविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. हे पॉवर बँक तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता.
1. Ambrane PowerLit XL
भारतातील सर्वोत्तम पॉवर बँकच्या यादीमध्ये Ambrane Powerlite XL या पॉवर बँकचा देखील समावेश आहे. या पॉवर बँकमध्ये 2 यूएसबी टाइप-ए आउटपुट पोर्ट, सेल्फ-चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह सुसज्ज आहे आणि ते इनपुट आणि आउटपुट पोर्ट म्हणून वापरले जाऊ शकते.
या पॉवर बँकमध्ये 20,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तुम्ही तुमचा स्मार्टफोन कमी वेळेमध्ये चार्जिंग करू शकता. या पॉवर बँकची किंमत 1,299 रुपये आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये तुम्हाला दमदार पॉवर बँक मिळत आहे.
2. ब्लूई बल्की पॉवर बँक
ब्लूई बल्की या पॉवर बँकचा आकार कमी असल्याने तुम्ही तो सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. या आकाराने लहान असल्याने सहज तुमच्या खिशामध्ये बसू शकतो. त्याचे वजन फक्त 258 ग्रॅम आहे. या पॉवर बँकमध्ये 20000mAh पॉलिमर-आधारित बॅटरी आणि मल्टी-प्रोटेक्शन वैशिष्ट्यांसह देण्यात आली आहे. ज्याची किंमत फक्त 1,999 रुपये आहे.
3. Mi i3 पॉवर बँक
Mi कंपनीचे स्मार्टफोनचं नाही तर त्यांची इतर उत्पादने देखील अधिक लोकप्रिय आहेत. Mi कंपनीचा 20,000 mAh बॅटरीसह येणार पॉवर बँक फक्त 2,149 रुपयांना मिळत आहे. हा पॉवर बँक टाइप सी पोर्ट किंवा मायक्रो यूएसबी या शक्तिशाली पॉवर बँकेच्या री-चार्जिंगला सपोर्ट करते.
4. पोर्ट्रोनिक्स पॉवर बँक
पोर्ट्रोनिक्स पॉवर बँकमध्ये अनेक दमदार वैशीष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच या पॉवर बँकांच्या बॅटरीची क्षमता 20,000 mAh देण्यात आली आहे. हा पॉवर बँक 1,899 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कमी किमतीत जबरदस्त पॉवर बँक तुम्ही खरेदी करू शकता.
5. झूक पॉवरमेट 6
झूक पॉवरमेट 6 या पॉवर बँकमध्ये देखील 20,000 mAh लिथियम आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. या पॉवर बँकांची किंमत 2,999 रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला कमी किमतीमध्ये पॉवर बँक खरेदी करण्याची संधी मिळत आहे.