Best Recharge Plans : टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी दिवसेंदिवस स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. मात्र ग्राहक दरमहा रिचार्ज करून कंटाळले आहेत. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी वर्षभराचे रिचार्ज प्लॅन आणले आहेत.
जर तुम्हीही दरमहा रिचार्ज करून कंटाळला असाल तर काळजी करू नका. आता Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea या टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. या रिचार्ज प्लॅनची वैधता देखील 365 दिवसांची आहे.
पण जर तुम्हाला वर्षभराचा रिचार्ज करायचा नसेल तर तुम्ही देखील 2 महिन्यांचा रिचार्ज स्वस्तात करून शकता. त्यामुळे दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट दूर होईल. तसेच पैशांची देखील बचत होईल.
Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea तलिकं कंपन्यांनी 2 महिन्यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या रिचार्ज प्लॅनची वैधता 56 दिवस देण्यात येत आहे. तसेच अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि अनेक सुविधा देण्यात येत आहेत.
एअरटेलचा 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलने ग्राहकांसाठी 2 महिन्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 479 रुपये आहे. याची वैधता 56 दिवस देण्यात येत आहे. या रिचाज प्लॅनमध्ये मर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस सुविधा तसेच दररोज 1.5 जीबी डेटाचा लाभ देण्यात येत आहे. याशिवाय विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून यांसारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे.
जिओचा 479 रुपयांचा प्लॅन
जिओ टेलिकॉम कंपनीकडून सध्या ग्राहकांसाठी स्वस्तातील रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. जिओ कंपनीकडून देखील आता 479 रुपयांचा प्रीपेड प्लान सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. तसेच यामध्ये दररोज 100SMS, अमर्यादित कॉलिंग आणि 1.5GB डेटा देण्यात येत आहे. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा मोफत लाभ देण्यात येत आहे.
VI 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vodafone Idea म्हणजेच Vi ने देखील ग्राहकांसाठी 2 महिन्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. याची किंमत 479 आहे आणि त्याची वैधता 56 दिवसांपर्यंत आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येत आहे. तसेच Vi च्या अॅप्सचा मोफत लाभ देण्यात येत आहे. डेटा डिलाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही देण्यात येत आहे.