Best Summer Destination : उन्हाळ्यात भेट देण्यासाठी ही आहेत सर्वोत्तम ठिकाणे, जिथे तुम्ही निवांत क्षण घालवू शकता

Published on -

Best Summer Destination : तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही ठिकाणे तुमची सहल आनंददायी बनवू शकतात. अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विदेशात फिरायला जातात. मात्र भारतामध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी अविस्मरणीय ठरू शकतात.

विदेशात जाऊन तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्याची काहीही गरज नाही. कारण भारतामध्ये अशी काही सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत जी तुम्हाला विदेशातील ठिकाणांचा आनंद देऊ शकतात.

भारतात सहलीला जाण्यासाठी एकापेक्षा एक सुंदर ठिकाणे आहेत. या सुंदर ठिकाणांना दरवर्षीं लाखो पर्यटक भेट देत असतात. तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणांना भेट देऊ शकता.

दार्जिलिंग

या सुंदर आणि मनमोहक ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. दार्जिलिंगला क्वीन ऑफ हिल्स असेही म्हणतात. बर्फाच्छादित कांचनजंगाचे खास दृश्य तुम्ही येथे पाहू शकता. हिरव्यागार चहाच्या बागांचे सौंदर्य लोकांना मंत्रमुग्ध करते.

शिलाँग

मेघालायची राजधानी शिलाँग या प्रसिद्ध सुंदर ठिकाणाला देखील लाखो पर्यटक भेट देत असतात. तुम्हीही या ठिकाणाला भेट देऊन नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेऊ शकता. येथील तलाव आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत सुट्यांचे दिवस तुम्ही येथे घालवू शकता.

लडाख

लडाख हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथील सुंदर दऱ्या प्रत्येकाला पहायच्या असतात. येथील बर्फवृष्टी हे आकर्षणाचे केंद्र आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात लडाखला जाणार असाल तर पॅंगॉन्ग सरोवर पाहायला विसरू नका. या तलावाचे सौंदर्य पाहूनच लोकांना आनंद वाटतो. याशिवाय मॅग्नेटिक हिल, झांस्कर व्हॅली इत्यादी पर्यटन स्थळेही तुम्ही पाहू शकता.

मुन्नार

केरळमधील मुन्नार हे एक प्रसिद्ध सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणचे तलाव, एरविकुलम नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. तसेच या ठिकाणी अनेक सुंदर मोठमोठे धबधबे आहेत.

औली

औलीला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्हाला त्रिशूल शिखराचे सौंदर्य पाहता येईल. जर तुम्ही साहस प्रेमी असाल तर चिनाब तलावाला नक्की भेट द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe