Best Summer Destination : या शहराला म्हणतात भारताचे स्कॉटलंड, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही देऊ शकता या सुंदर हिल स्टेशनला भेट

Ahmednagarlive24 office
Published:

Best Summer Destination : उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेक सदस्यांना आणि मुलांना सुट्टी असल्याने प्रत्येकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतो. त्यामुळे अनेकजण सुंदर ठिकाणे शोधत असतात. तसेच बरेचजण भारतातून विदेशात फिरायला जात असतात.

पण आता तुम्हाला भारताबाहेर फिरायला जायची गरज नाही. कारण भारतामध्ये अशी काही सुंदर पर्यटन स्थळे आहे जी तुम्हाला विदेशातील पर्यटन स्थळांचा आनंद देतील. प्रत्येकजण उन्हाळ्यामध्ये हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन करत असतो. या ठिकाणी थंड वातावरण असते त्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी हिल स्टेशनला भेट देत असतात.

भारतमध्ये असे एक सुंदर शहर आहे ज्यांना भारतचे स्कॉटलंड म्हंटले जाते. या सुंदर हिल स्टेशनला तुम्ही देखील भेट देऊ शकता. ज्याने तुमची सहल आनंददायी होईल.

कुर्ग हे अतिशय सुंदर ठिकाण आहे

भारतातील एक सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणांपैकी कुर्ग हिल स्टेशन हे एक आहे. या ठिकाणी निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. येथे तुम्ही जंगले, दऱ्या, नद्या आणि तलावांमधून फिरू शकता. तसेच तेथील पक्षी आणि वन्यजीव पाहता येतात.

मडिकेरी पॅलेस, नागरहोल आणि तलकावे हिल मंदिर यांसारखी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. भारतातील एक अद्भुत पर्यटन स्थळ म्हणून कुर्गला ओळखले जाते. तसेच कुर्गला भारताचे स्कॉटलंड म्हणून देखील ओळखले जाते.

कुर्गमधील या ठिकाणांना भेट द्या

मल्लाली धबधबा

कुर्ग शहरापासून अवघ्या 25 किमी अंतरावर मल्लाली धबधबा धबधबा आहे. हे ठिकाण सुंदर पर्वतीय दृश्ये आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी देखील भेट देऊ शकता.

ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य

कुर्गमधील प्रसिद्ध ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य हे देखील पर्यटकांचे आकर्षक ठिकाण आहे. 1974 मध्ये या अभयारण्याची स्थापन करण्यात आली आहे. वॉकिंग टूर, जंगल सफारी किंवा जंगल ट्रेकिंगद्वारे तुम्ही येथील वन्य पाहू शकता.

Abbey Falls

कूर्गमधील हे एक सुंदर ठिकाण आहे ज्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही सहलीचा आनंद वाढवू शकता. या ठिकाणी एक सुंदर दिभातारा नदीच्या मार्गावर एक धबधबा आहे जो ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर आहे.

रिव्हर राफ्टिंग

कूर्ग हे रिव्हर राफ्टिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. कूर्ग रिव्हर राफ्टिंगचा हंगाम जुलै ते सप्टेंबरपर्यंत चालतो. राफ्टिंगसाठी, तुम्हाला कूर्ग नदीच्या काठावर वसलेल्या दुबरे एलिफंट कॅम्पला जावे लागेल.

कुर्ग हिल स्टेशनला कसे जायचे

हवाई मार्ग

जर तुम्हाला कुर्ग हिल स्टेशनला भेट देयची असेल तर कर्नाटकात मंगळुरू आणि बंगलोर या शहरामधून प्रवासी विमाने मिळू शकतात. या ठिकाणाहून तुम्ही कुर्ग ला जाऊ शकता.

रेल्वेमार्गे

कुर्गसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके मूडबिद्री आणि हसन आहेत. तेथून तुम्ही टॅक्सी, बस किंवा भाड्याने घेतलेली वाहने वापरू शकता. या रेल्वे स्थानकापासून कुर्ग हे जवळच आहे.

रस्त्याने

कुर्ग हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७५ द्वारे बंगलोर, मंगलोर आणि म्हैसूरशी जोडलेले आहे. प्रवासी स्वतःची कार, टॅक्सी किंवा बस वापरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe