भारत

Best Summer Destinations : भारतातील या सुंदर हिल स्टेशनला द्या भेट, उन्हाळ्याच्या सुट्टीतील सहल होईल आनंददायी…

Best Summer Destinations : या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील काही सुंदर हिल स्टेशन आहेत. ज्याठिकाणी तुम्ही देखील भेट देऊ शकता. भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

जर तुम्हीही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत उन्हाळ्याची सुट्टी घालवू इच्छित असाल तर खालील ५ हिल स्टेशनला भेट देऊन सुट्टीचा आनंद घेऊ शकता. तसेच थोडा वेळ कुटुंबासोबत देखील घालवू शकता.

चटपाल, जम्मू कश्मीर

काश्मीर खोऱ्यातील शांगस जिल्ह्यात चटपाल हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी भेट देऊ शकता. फार कमी लोकांना या पर्यटन स्थळाबाबत माहिती आहे. तुम्ही या ठिकाणी थंड पाण्याच्या नदीकाठचा आणि हिरव्यागार कुरणांचा आनंद घेऊ शकता.

अस्कोट, उत्तराखंड

उन्हाळ्याच्या सुट्टीत हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन आहे तर तुम्ही अस्कोट या हिल स्टेशनला भेट देऊन सहल अविस्मरणीय बनवू शकता. हे हिल स्टेशन उत्तराखंडच्या पूर्वेला भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. हे सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे.

केम्म्रगुंडी, कर्नाटक

सुंदर आणि नैसर्गिक हिल स्टेशनला भेट देईची असेल तर तुम्ही कर्नाटक मधील केम्म्रगुंडीहिल स्टेशनला भेट देऊ शकता. बंगळुरूपासून सुमारे 273 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर धबधब्यांचा आनंद घेऊ शकता.

कल्पा , हिमाचल प्रदेश

कल्पा हे एक उत्तर भारतातील सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही सुट्ट्यांमध्ये आवश्य भेट द्या. सतलज नदी घाटातील हे शहर सफरचंदाच्या बागा, घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग देखील करू शकता.

तुंगी, महाराष्ट्र

महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही सहलीचे नियोजन करून आनंद घेऊ शकता. तुंगी हे महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन ठिकाण आहे. पुण्यापासून ८५ किमी अंतरावर वसलेले हे पर्यटन स्टाल आहे. पवना तलावावर ट्रेकिंग करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts