Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ होते. चाणक्यांनी चाणक्य निती ग्रंथामध्ये मानवी जीवनात आर्थिक दृष्ट्या सफल होईचे असेल तर यासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा अवलंब करून मनुष्य आयुष्यात सुख,शांती आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल.
चाणक्यांचे मते माणूस जीवनात अश्या अनेक चुका करत असतो त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्य येते. त्यामुळे अनेकांना गरिबीचा सामना करावा लागतो. मात्र काही चुका करणे टाळल्याने लक्ष्मी माता कधीही नाराज होत नाही.

रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर कधीही खरकटी भांडी ठेऊ नये. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते. यामुळे गरिबी वाढते. तसेच आर्थिक लाभही होत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच भांडी धुवावी.
ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी गरिबी येते. तसेच आर्थिक दृष्ट्या तो व्यक्ती कमकुवत होतो.
संध्याकाळी घरात झाडू मारल्याने घरातील आशीर्वाद निघून जातात. संध्याकाळ म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास कचरा घरातच ठेवावा.
जे लोक नेहमी अनावश्यक खर्च करतात, पैशाला महत्व देत नाहीत, खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत अशा लोकांच्या घरी कधीच माता लक्ष्मी थांबत नाही. त्यामुळे गरिबी येते.
पैसे कमावण्याच्या लालसेपोटी पैशाचा चुकीचा वापर करणे किंवा पैशाच्या जोरावर इतरांना त्रास देणे हे माणसाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणते. असा पैसा क्षणभर आनंद देऊ शकतो, पण नंतर सगळी पुंजी हाताबाहेर गेलेली असते. म्हणूनच थोड्या आनंदासाठी चुकीच्या मार्गावर जाऊ नका.